दीपिका-आलिया नव्हे, तर 'ही' आहे संजय लिला भन्साळींची फेव्हरेट अभिनेत्री

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी 'हिरामंडी' वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. नेटप्लिक्सवर त्यांची वेब सीरिज सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली आहे.

संजय लिला भन्साळी यांच्यासह वारंवार काम करण्याची अनेक अभिनेत्यांची इच्छा असते. पण त्यांना स्वत:ला तसं वाटत नाही. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.

"मी रणबीर, रणवीर, दीपिका, माधुरी दिक्षित, अमिताभ अनेक मोठ्या अभिनेत्यांसह काम केलं. पण ह्रतिक, प्रियांका, नाना पाटेकर, सिमा बिस्व माझे फेव्हरेट आहेत".

"या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी आणि रिचा चढ्ढा मला आवडल्या आहेत. मला वाटतं या सर्वांशी माझं चांगलं कनेक्शन आहे"

"जेव्हा मी त्यांना पुन्हा घेत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटतं. आम्ही संजयला इतकं दिलं, मग या चित्रपटात का नाही? अशी विचारणा ते करतात"

"पण मला कधीकधी कास्टिंग फार ऑर्गेनिक वाटतं. त्याच्या खोलीत जावं लागतं. आपण येथे नाती तयार करण्यासाठी आलो नाही"

"तुम्ही अभिनय केलात, तुमचा वेळ दिलात, मेहनत केली आणि स्क्रीनवर जादू पसरवलीत त्यासाठी आभारी आहे. याबद्दल मी तुमचा सन्मान आणि प्रेम करतो"

"माझ्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या 90 टक्के अभिनेत्यांनी स्क्रीनवर जादू केली आहे. हे त्यांचं प्रेम आणि आदर आहे. ते आपलं सर्वोत्तम देतात"

VIEW ALL

Read Next Story