गडद अंधारात अनुभवता येणार मिण मिण प्रकाश, काजवा महोत्सव

वळवाच्या पावसाचे वेध लागले की काजवा महोत्सव सुरु होतो

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजवांच्या मिलनाचा हा क्षण अनुभवता येणार

लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळच घातलीय असा अनुभव येतो.

काजवा हा कणा नसलेला म्हणजेच अपृष्ठवंशीय गटातील कीटक. काजवे निशाचर असल्याने रात्रीच सक्रिय होतात.

नर काजव्यांच्या पाठीवर दिव्यांप्रमाणे लुकलुकणारा प्रकाश बघायला मिळतो. जैविक कचरा विघटन, परागीभवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

महाराष्ट्रात काजवा महोत्सव अनुभवता येणार आहे. असंख्य पर्यटक निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचा आनंद घेतात.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा काजव महोत्सव दर वर्षी भंडारदरा भागात आयोजित केला जातो. वेगवेगळ्या भागांतून पर्यटक, निसर्गप्रेमी महोत्सवात सहभागी होतात.

भंदारदरा, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, रंधा धबधब्याजवळ अनुभवता येते.

भीमाशंकरचा काही भाग, ताम्हिणी अभयारण्य, पौड-मुळशी लोणावळ्यातील राजमाची वनक्षेत्रात काजवा महोत्सव आयोजित केले जातात.

VIEW ALL

Read Next Story