डिअर जिंदगी : दिवाळीच्या तीन गोष्टी आणि मुलं

मुलं कसे शिकतात. याबाबतीत आपण नेहमी बोलत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की ते कोणत्या ग्रहावरून या गोष्टी शिकून येतात. पण नेमक्या कुठून, कशा ते या गोष्टी शिकून येतात, आणि असं करू लागतात, ज्याची आपल्याला सुतराम शक्यता नसते.

Updated: Nov 22, 2018, 11:53 PM IST
   डिअर जिंदगी : दिवाळीच्या तीन गोष्टी आणि मुलं title=

दयाशंकर मिश्र : मुलं कसे शिकतात. याबाबतीत आपण नेहमी बोलत असतो. आपल्याला नेहमी वाटतं की ते कोणत्या ग्रहावरून या गोष्टी शिकून येतात. पण नेमक्या कुठून, कशा ते या गोष्टी शिकून येतात, आणि असं करू लागतात, ज्याची आपल्याला सुतराम शक्यता नसते.

ही दिवाळी मुलांच्या ज़डणघडणाच्या हिशेबातून खूपकाही शिकवणारी ठरली. या दिवाळीत आपण आपलेच काही वेगवेगळे चेहरे पाहिले. आपण एक चेहरा वाचू शकलो, त्यानंतर दुसऱ्याकडे वळलो, यानंतर हे सतत सुरू राहिलं.

आपल्या जीवनात धर्म आणि राजकारण यांची एवढी घालमेल सुरू केली आहे की, आता हे आपल्यासाठी भस्मासूर ठरत आहेत. आपण मुलांचे वैज्ञानिक विचार, गंभीर विषयांवर चिंतन देण्याऐवजी, रोबोटिककडे, म्हणजे जसं सांगितलं जातंय, बोललं जातंय, त्यादिशेला त्यांना ढकलत आहोत.

या दिवाळीत तीन गोष्टी मिळाल्या

पहिली गोष्ट : टीव्ही, न्यूज पेपरवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या भरगच्च बातम्या आहेत. मुलं देखील या दरम्यान पाहत होते की, कशाप्रकारे हिरवे फटाके, फटाक्यांवरील बंदीवर चर्चा होत आहे. 

अशावेळी दिल्लीतील इंदिरापुरममधील शर्मा परिवारने जेव्हा निर्णय घेतला की,  त्यांना फटाक्यांपासून दूर रहायचं आहे. तेव्हा त्यांनी दहा, पंधरा वर्षाच्या मुलांना ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न केला.

मुलांनी जेव्हा सांगितलं, इतर मुलं फटाके फोडतात, तेव्हा त्यांनी मुलांना सांगितलं, ती मुलं आमचं काहीच ऐकत नाहीत, तेव्हा तुम्ही देखील काही ऐकणार नाहीत का आमचं?.

शेजारच्या काकूंचा ६ महिन्यांचा मुलगा, आपला डॉगी जेम्स, बाल्कनीतील कबूतर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण श्वास घेतो, ती हवा खराब होत आहे. फटाके आपण फोडले नाहीत, तर ही हवा कुठेतरी शुद्ध असणार आहे.

आता शर्मा परिवारातील कुणीच फटाके फोडले नाहीत. मुलांनी त्यांची गोष्ट सहज समजून घेतली. मोठ्यांनी जरा वातावरण थोडं कडक केलं, तरी याचा अर्थ नको असाच असतो.

धडा : मुलांनी हे सहज समजून घेतलं की, आपल्याला आपल्या सारखं व्हायचं आहे. सर्वांसारखं नाही. घरात नियम सर्वांसाठी आहेत, मुलांसाठी कोणतेही खास नियम नाहीत. ही पालनपोषणातील सर्वात चांगली, सुंदर शिक्षण शैली आहे.

 

दुसरी गोष्ट : दिल्लीच्या वर्मा परिवारातील मुलांना देखील सुप्रीम कोर्टाचा, दिवाळीत प्रदूषणाचा निर्णय व्यवस्थित माहित होता. शाळेत देखील प्रदूषणाविषयी सतत माहिती दिली जात होती. यावरून कुटूंबातील सर्व ६ मुलांनी ठरवलं की, दिवाळीत फटाके नाही फोडायचे. 

या मुलांनी मागच्या दिवाळीत फटाके फोडले होते. पण यावेळी मीडिया, सुप्रीम कोर्ट आणि शाळेने जनजागृती केल्याने त्यांनी निर्णय बदलला. पण काका आणि वडील या विचाराशी सहमत नव्हते. 

ते कोर्टाच्या आदेशाला कट्टर हिंदू संस्कृती, परंपरेत 'नाक खूपसणे' म्हणत होते. या लोकांनी खूप फटाके फडले, अगदी मन भरेपर्यंत फटाके फोडले. या परिवारातील काही लोक पोलिसात देखील आहेत. त्यांनी आक्रमणपणे दिवाळी साजरी केली.

धडा : मुलं गोंधळलेल्या, संभ्रमात आहेत. त्यांना वाटतं वयाने मोठी लोकं अशी का वागली. त्यांना हे सांगून गप्प बसायला सांगितलं की, हा धर्माचा विषय आहे, यात त्यांना सल्ला देण्याची गरज नाही. 

कदाचित वर्मा परिवारातील मोठी लोकं हे समजू शकले असते, तर बरं झालं असतं. पण त्यांना असं वाटतं की मुलं आपला निर्णय घ्यायला लागले, तर याच्यापुढे त्यांना रोखणं कठीण होणार आहे.

 

तिसरी गोष्ट: दिल्लीत सर्वात जास्त फटाके एनसीआरमध्ये फोडण्यात आले. वसुंधराचं कुटूंब, सर्व सदस्यांसह फटाके खरेदी करण्यासाठी जात होतं. यावेळी त्यांच्या येथे खूप वाद झाले. ती देखील या आदेशाला कधी हिंदू उत्सव, तर कधी प्रदूषण या दृष्टीकोनातून पाहत होती. 

शेवटी ती प्रदूषणाला पूर्णपणे फटाके जबाबदार आहेत, हे मानायला तयार झाली नाही. पण असं काही झालं की तिने एकही फटाका फो़डला नाही. 

त्यांचे एक नवीन शेजारी, ज्यांच्याशी जुनी ओळख होती, त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना अस्थमाचा त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोकटा झटका आला. ते नेहमी असं म्हणत की मी एकट्याने फटाके नाही फोडले तर काय मोठा फरक पडणार आहे. त्यांचं वय अवघं ४० वर्ष होतं, सुदैवाने ते वाचले.

डॉक्टरांनी सांगितलं की, अस्थमाची तक्रार आधीपासून होती, पण कोणतीच दिवाळी त्यांची फटाक्यांशिवाय जात नव्हती. ते नेहमी म्हणायचे, मी एकट्याने फटाके नाही फोडले तर काय होणार आहे.

धडा : शेजारच्यांवर जे जे तब्येतीचं संकट ओढवलं, त्यावरून लक्षात आलं आहे की, एक एक गोष्टीने फार मोठा फरक पडतो. आपण सर्व मिळून जग सुंदर आणि वाईट करतो. आपली हवा, पाणी जसंही असेल, यात आपल्या सर्वांची एक भूमिका आहे.

दिवाळीच्या या ३ गोष्टी समाजाचा विचार, समज आणि व्यवहाराची सरळ उदाहरणं आहेत. आपण काय होऊ इच्छीतो, आपल्याला कसं जग हवं आहे. हे काही 'रॉकेट सायन्स' नाही. जे 'कॉमन मॅन'ला समजणार नाही. शेवटी सर्वकाही आपल्यालाच ठरवायचं आहे.

फटाक्यांचा आवाज एक गंभीर इशारा आहे. याने हे सिद्ध केलं आहे की, जीवन आपल्यासाठी किती कमी महत्वाचं होत चाललं आहे. निसर्गाच्या काही मर्यादा आहे. पर्यावरणासाठी असलेला आदर हळू हळू कमी होत चालला आहे. आपण परंपरा, उत्सवात मानवतेला जागा दिली नाही, तर प्रत्येक वर्षी आपण आणखी निकामी होत जाऊ.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)