डिअर जिंदगी : 'होम मिनिस्टर' तुमच्या 'परफेक्ट सूनबाई'चं मन आतल्या आत रडतंय!

सासरी सर्वश्रेष्ठ आचरण, सर्वांचं मन जिंकण्याची जणू घुट्टीचं पाजली जाते. सुशिक्षित मुली देखील या चक्रव्‍यूहमधून बाहेर पडू शकत नाहीत.

Updated: Nov 26, 2018, 01:16 PM IST
डिअर जिंदगी : 'होम मिनिस्टर' तुमच्या 'परफेक्ट सूनबाई'चं मन आतल्या आत रडतंय! title=

दयाशंकर मिश्र : ती एक सर्वोत्तम चित्रकार आहे. ग्लास पेटिंगवर तिने साकारलेले राधा-कृष्ण पाहा. तुम्हाला एक क्षण असं वाटेल, गोकुळात बासरीवाला कन्हैय्याच आता प्रकटणार आहे. तिचं सर्वात पहिलं पेटिंग तिने १५ वर्षापूर्वी चितारलं आहे. एका पारखी चित्रकाराने काही दिवसापूर्वी तिचं पेटिंगचं काम पाहिलं. तेव्हा त्यांनी या पेटिंगच्या सर्व बाजू निरखून पाहिल्या आणि त्या चित्रकारालाही स्वत:वर विश्वासच होत नव्हता. या पारखी चित्रकाराला वाटलं, या महिलेने आपल्या कलेचे 'पंख' स्वत:च कापून टाकले आहेत.

मध्यमवर्गीय कुटूंबात आपण ज्या पद्धतीने मुलींचं पालनपोषण करतो. त्यानुसार लग्नानंतर त्यांच्यात काही विशेष गुण शिल्लक राहत नाहीत, हे एक बेईमानी सारखंच आहे. सासरी त्यांनी फक्त आपल्यासाठी सांगायला, सेवेला 'परफेक्ट सून' राहावं अशी आपली अपेक्षा असते. या अशा वातावरणात त्यांच्यातील आतील गुणांचा विकास तर सो़डा, पण त्यांचा श्वास गुदमरण्याचीच शक्यता अधिक असते.

'डिअर जिंदगी'ला ही कहाणी मध्य प्रदेशातील रीवामधून मिळाली आहे. यात ग्लास पेटिंग्समध्ये दक्ष असलेल्या या युवा चित्रकाराची ही गोष्टी, तिच्या मित्राने पाठवली आहे. यात लिहिलं आहे की, मध्य प्रदेशात मुलींना सासरी सर्वश्रेष्ठ आचरण, सर्वांचं मन जिंकण्याची जणू घुट्टीचं पाजली जाते. सुशिक्षित मुली देखील या चक्रव्‍यूहमधून बाहेर पडू शकत नाहीत.

ती 'परफेक्ट चहा' बनवण्यापासून, स्वयंपाक घरात चवदार पदार्थ बनवण्यात गुंतून जाते. यात ती आपल्या स्वप्नांना पंख तर लावूच शकत नाहीय. पण नकळतपणे आपलेच पंख कापून टाकते.

मी येथे स्पष्ट करू इच्छीतो, मला असं म्हणायचं नाही की, मुलींनी सासरी सामंजस्याने वागू नये, किंवा इतरांशी आदरपूर्वक वागू नये. मी सर्व जोर यावरच देतोय की, आपण मुलींवर सर्व काही थोपतो. मुलींना सर्वांची काळजी घेतात, पण मुलींची काळजी कोण घेणार?. या प्रश्नाची चिंता कुणालाच वाटत नसेल ना. मुलींना जे मिळत, ते त्यांचं भाग्य, ही कल्पना अजून तरी आपल्या मनातून पुसली जात नाहीय.

हे परिवर्तन सोपं नाहीय. यासाठी एका रात्रीत आपण कोणत्याही परिवर्तनाची अपेक्षा नाही करू शकत. पण परिवर्तन मंद गतीने होत आहे. सर्वात अधिक चिंतेची बाब ही आहे की, युवा मन अजून सरंजामशाही पद्धतीतून बाहेर आलेलं नाही. जेथे महिला केवळ मर्यादा, शोभा, आपल्या आचरणाच्या आज्ञापालक आहेत.

अशात त्याचा श्वास आतल्या आत गुदमरतो, आपलं घर, परिवारासाठी चिंतेत. चिंतेत टाकणारी बाब ही आहे की आता महिलांमध्ये नैराश्य, तणाव वाढण्याचं प्रमाण अपेक्षेपेक्षा वेगाने अधिक वाढत आहे. या प्रमुख कारणांमुळे एक गोष्ट, ज्यामुळे चिंतेच्या बाबी काही प्रमाणात नियंत्रणात आणता येतील. ती आहे, त्यांच्यातील गुण, विशेषता यांचा आदर, सन्मान आणि त्यांच्यासाठी असलेला प्लॅटफॉर्म यांचा शोध घेण्यास मदत होवू शकते.

जोपर्यंत आपण मुलगा आणि सून यांना समान नजरेने पाहत नाही, समजून घेत नाहीत, त्यांच्या गुणांना वाव देत नाहीत. तोपर्यंत आपण नैराश्य, उदासपणा, आपल्या शरीरातून, मनातून, जीवनातून दूर नाही करू शकत.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)