10, 12 वी च्या विद्यार्थ्यांना उत्तम पर्याय, या 7 देशांत मिळते Free शिक्षण

शिक्षणासाठी परदेशात जायचा विचार करताय?

10, 12 वी च्या विद्यार्थ्यांना उत्तम पर्याय, या 7 देशांत मिळते Free शिक्षण  title=

मुंबई : CBSE ने आपला 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थी आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करत असतात. काहीजण भारतातच राहून शिक्षण घेणार आहेत तर काही विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण पसंत करतात. अनेक विद्यार्थी बारावीनंतर परदेशात शिक्षणासाठी जाणं पसंद करतात. मात्र परदेशातील शिक्षण महाग असल्या कारणाने विद्यार्थी गोंधळतात. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात असे अनेक देश आहेत जिथे शिक्षण मोफत मिळणार आहे. 

जर्मनी - उत्तम शिक्षण मिळण्याबाबत जर्मनी अग्रेसर आहे. इथे कोणत्याही सरकारी विश्वविद्यालयात ट्यूशन फी आकारली जात नाही. जरी या देशात शिक्षण घेणारा विद्यार्थी जर्मनीतील नसला तरीही त्याला सारखेच नियम लावले जातात. याठिकाणी विद्यार्थ्याला अॅडमिनिस्ट्रेशन फी भरावी लागते जी वर्षाला 11 हजार ते 19 हजारापर्यंत असते. 

नॉर्वे - या देशात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट प्रोग्राम पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही नॉर्वे या देशाचे नागरिक असा किंवा इतर देशातील नागरिक असा यासाठी कोणता वेगळा नियम नाही. फक्त येथे मोफत शिक्षण घेण्यासाठी अत्यंत महत्वाची एक अट मान्य करावी लागणार आहे. आणि ती अट म्हणजे नॉर्वे ही भाषा तेथील विद्यार्थ्यांना शिकावी लागेल. 

फिनलँड - कोणत्याही देशातील नागरिकाकडून फिनलँडमध्ये ट्यूशन फी आकारली जात नाही. मात्र गेल्या काही वर्षात नियम बदलले आहेत. आता युरोपीय यूनियन आणि यूरोपियन इकोनॉमिक एरियाच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाणार आहे. 

स्वीडन - ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामकरता स्वीडनमध्ये यूरोपीय इकोनॉमिक एरियाच्या विद्यार्थ्यांकडून फी आकारली जात नाही. भारतासारखे देश यामध्ये येत नाहीत असे असले तरीही पीएचडी करता इथेपूर्णपणे मोफत आहे. तसेच सरकारकडून या विद्यार्थ्यांना दर महिन्याला काही पैसे दिले जातात. 

फ्रान्स आणि स्पेन - इथे सरकारी यूनिर्व्हसिटीसोडून इतर ठिकाणी शिक्षण मोफत आहे. तसेच स्पेन देखील यूरोपीय युनियनच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देते. बाकी विद्यार्थ्यांकरता कमी फी आहे. भारतीयांसाठी काही स्ट्रीममध्ये मोफत शिक्षणासाची संधी उपलब्ध आहे. 

ऑस्ट्रिया - इथे यूरोपीय यूनियन विद्यार्थ्यांना शिक्षण फ्री आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते. मात्र महत्वाची गोष्ट ही आहे की ही फी देखील अतिशय कमी असते. भारतीय रुपयांमध्ये बोलायचं झालं तर 55 हजारापर्यंत वर्षाची फी असते.