इस्रोमध्ये नोकरीची संधी

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 20, 2017, 06:56 PM IST
इस्रोमध्ये नोकरीची संधी  title=

नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. 

इस्रोने १०वी पास झालेल्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासंदर्भात इस्रोने अधिसूचनाही काढली आहे. १२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. 

इस्रोमध्ये हलके वाहन चालक, जड वाहन चालक आणि स्टाफ कार चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक योग्यता : इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थानमधुन १०वी पास असावा. आवश्यक ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे असावं. यासोबतच ३ ते ५ वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभवही त्याला असणं गरजेचं आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २९ ऑगस्ट २०१७

वेतन - प्रति महिना १९,९०० व

वयोमर्यादा - २८ ऑगस्ट २०१७ रोजी ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे

इच्छूक व्यक्तींसाठी इस्रोच्या http://www.isac.gov.in/Driver-2017/advt.jsp या वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.