मराठा मोर्चा सुट्टी, मुंबईत शनिवारी पूर्ण दिवस शाळा

मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळा येत्या शनिवारी पूर्ण दिवस असणार आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी दिलेल्या एका दिवसाच्या सुटीची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

Updated: Aug 11, 2017, 02:50 PM IST
मराठा मोर्चा सुट्टी, मुंबईत शनिवारी पूर्ण दिवस शाळा title=
संग्रहित छाया

मुंबई : मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळा येत्या शनिवारी पूर्ण दिवस असणार आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी दिलेल्या एका दिवसाच्या सुटीची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबई महानगर पालिकेच्या शाळा उद्या म्हणजेच शनिवारी सुरु राहणार आहेत. पुढील दोन शनिवार बीएमसीच्या शाळा सुरु राहणार आहेत. 

मराठा क्रांती मोर्चामुळे 9 ऑगस्टला मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्या सुट्टीची भरपाई म्हणून येणारे दोन शनिवार पुर्ण दिवस शाळा भरवण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.