MMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Sunil Desale | Updated: May 26, 2018, 06:26 PM IST
MMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज title=
Image: mmrda.maharashtra.gov.in

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी आणि किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

पद : उपलेखापाल

एकुण जागा : २५

शैक्षणिक अर्हता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी / प्रगत लेखांकन आणि लेखापरिक्षण या विशेष विषयासह वाणिज्य शाखेची पदवी (Advance Accountancy and Auditing as special subject) 

वयोमर्यादा : ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

वेतनश्रेणी : ९३०० - ३४८०० + ग्रे.वे.रु. ४३००/-

 

पद : दूरध्वनीचालक

एकुण जागा : १

शैक्षणिक अर्हता : उमेदवार माध्यमिक शालान्त परीक्षा किंवा तत्सम दर्जाची शासनमान्य संस्थेची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने शासनमान्य संस्थेमार्फत दूरध्वनीचालक पदाकरिता आवश्यक असलेला कोर्स केलेला असणं आवश्यक. उमेदवाराचे इंग्रजी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असावे तसेच हिंदी भाषा सफाईदारपणे बोलता येणे आवश्यक.

वयोमर्यादा : मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे वयोमर्यादा राहील.

वेतनश्रेणी : ५२००-२०२०० + ग्रे.वे.रु. २०००/-

अर्ज करण्याची पद्धत आणि तारीख : इच्छुक उमेदवारांनी https://mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फत दिनांक २२-०५-२०१८ ते दिनांक १०-०६-२०१८ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक राहील. हस्तदेय / टपालाद्वारे प्राप्त झआलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://mmrda.maharashtra.gov.in/documents या संकेतस्थळावर पहायला मिळेल.

अर्ज करण्यासाठी https://cdn.digialm.com/EForms या लिकंवर क्लिक करा.