सारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ३०० जागांसाठी मागवले अर्ज

तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सारस्वत बँकेने आपल्या बँकेत ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

Updated: May 26, 2018, 06:01 PM IST
सारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ३०० जागांसाठी मागवले अर्ज title=
Image: saraswatbank.com
मुंबई : तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सारस्वत बँकेने आपल्या बँकेत ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
 
सारस्वत बँकेत जुनिअर ऑफिसर पदाच्या ३०० जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया देशभरातील विविध राज्यांत होत आहे. पाहूयात कुठल्या राज्यात कुठल्या शहरात आणि किती जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.
 
पदाचे नाव : जुनिअर ऑफिसर
 
एकूण पदसंख्या : ३००
ठिकाण  सेंटर   पदसंख्या
महाराष्ट्र मुंबई / नवी मुंबई / ठाणे १८५
  पुणे ४०
 
औरंगाबाद
१५
  नागपूर १०
  कोल्हापूर  १५
  नाशिक ०५
मध्य प्रदेश इंदुर ०५
राजस्थान जयपुर ०५
कर्नाटक बंगळुरु, बेळगाव, हुबळी १०
गुजरात अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा १०

 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी (प्रथम श्रेणी)

वयोमर्यादा : २१ ते २७ वर्ष 
 
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ०४ जून २०१८
 
इच्छुक उमेदवारांनी http://www.saraswatbank.com या संकेतस्थळामार्फत दिनांक ०४-०६-२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक राहील.