तरुणांसाठी खूशखबर : राज्य शासनाच्या विविध विभागात ३६ हजार पदांसाठी भरती

Updated: May 16, 2018, 04:50 PM IST

मुंबई : झी २४ तासनं दिलेल्या बातमीनंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ३६ हजार रिक्त पदं भरण्याचा निर्णय आज घेण्यात आला. विशेष म्हणजे कृषी खात्याशी संबंधित ही पदं भरली जाणार आहेत.

हे आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत ही सर्व पदं भरली जाणार आहेत. आठ मे रोजी झी २४ तासनं राज्यातली २ लाख पदं रिक्त असल्याची बातमी दाखवली होती. त्यानंतर राज्य सरकारला जाग आली असून आता ३६ हजार पदं भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

पदं रिक्त असल्यानं ग्रामीण भागात जनतेची कामं रखडल्याचं वास्तव झी २४ तासानं पुढे आणलं होतं. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close