६ लाखाचा एक बिटक्वाइन, जाणून घ्या कशी काम करते ही मुद्रा

व्हर्चुअल करन्सी बिटक्वॉईन आता केवळ हॅकर्सचीच पंसती नाहीतर गुंतवणूकदारांच्याही पसंतीस उतरत आहे. बिटक्वॉईनची जास्त चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरू आहे.

Updated: Nov 29, 2017, 02:27 PM IST
६ लाखाचा एक बिटक्वाइन, जाणून घ्या कशी काम करते ही मुद्रा title=

मुंबई : व्हर्चुअल करन्सी बिटक्वॉईन आता केवळ हॅकर्सचीच पंसती नाहीतर गुंतवणूकदारांच्याही पसंतीस उतरत आहे. बिटक्वॉईनची जास्त चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरू आहे.

पण अनेकांना हे बिटक्वॉईन काय आहे हेच माहिती नाही. बिटक्वॉईनची व्हॅल्यू आत्तापर्यंतच्या सर्वात उंच स्तरावर पोहोचली आहे. बाजारात एका बिटक्वॉईनची किंमत आता १० हजार डॉलर इतकी झाली आहे. म्हणजे भारतीय रूपयात एका बिटक्वॉईनची किंमत ६ लाख ४५ हजार रूपयांपेक्षाही जास्त आहे. 

पहिल्यांदाच व्हॅल्यू इतकी वाढली

२००९ मध्ये सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच बिटक्वॉईनने १० हजार डॉलरचा आकडा पार केलाय. त्यामुळे हॅकर्ससोबतच बिटक्वॉईन आता गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी यात गुंतवणूक करून ठेवली आहे. परदेशात याला मान्यता असली तरी भारतात अजून याला मान्यता मिळालेली नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरनं आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. आता भारतीय सुरक्षा यंत्रणांना चकमा देण्यासाठी दाऊदनं बिटकॉइन या डिजीटल चलनाचा वापर सुरू केलाय, असा दावा त्यानं केलाय.

काय आहे बिटक्वॉइन?

बिटक्वॉइनची सुरूवात जानेवारी २००९ मध्ये झाली होती. या व्हर्चुअल करन्सीचा वापर करून जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कुठूनही पेमेंट केले जाऊ शकते. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या पेमेंटसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. 

कसे काम करते ही डिजिट्ल करेंसी?

बिटक्वॉइनचा वापर पीयर टू पीअर ता टेक्नॉलॉजिवर आधारित आहे. याचा अर्थ हा की बिटक्वॉइनच्या मदतीने ट्रान्झॅक्शन दोन कम्प्युटरच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. या ट्रान्झॅक्शनसाठी कोणत्याही बॅंकेची गरज पडत नाही. बिटक्वॉइन ही ओपन सोर्स करंन्सी आहे. याद्वारे कुणीही ट्रान्झॅक्शन करू शकतं. कारण यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची किंवा आयडीची गरज पडत नाही. 

कुणी केली बिटक्वॉइनची सुरूवात?

बिटक्वॉइन सुरूवात कुणी केली याबाबत अजूनही स्पष्टपणे काही समोर आली नाहीये. अनेक लोकांनी हा दावा केलाय की, त्यांनी ही करन्सी सुरू केलीये. पण यावर अधिकृत माहिती नाही.

काय आहेत बिटक्वॉइनची वैशिष्ट्य़े?

बिटक्वॉइनमुळे दोन लोकांमध्ये सहज ट्रान्झॅक्शन केलं जाऊ शकतं. या दोन लोकांमध्ये ओळख असणेही गरजेचे नाहीये. तसेच ही देवाण-घेवाण करण्यासाठी कोणत्याही बॅंकेची गरज नाही. एकदा बिटक्वॉइनच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन केल्यास कॅन्सल करता येत नाही. 

ग्लोबल करन्सी मार्केटमध्ये ट्रेड होतात बिटक्वॉइन

२००९ मध्ये लॉन्च करण्यात आल्यानंतर बिटक्वॉइनच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कंपन्या आणि स्टोर बिटक्वॉइनच्या रूपात पेमेंट स्विकारतात. लंडनच्या ग्लोबल फॉरेक्स मार्केटमध्ये बिटक्वॉइन ट्रेड होतात, पण ही ट्रेडिंग केवळ व्हर्चुअल असते.