या छोट्या मुलाचे टॅलेंट पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास!

या व्हिडिओतील मुलगा चक्क सुरात गाताना दिसतो आहे. तो केवळ गातच नाही तर, सुरात गाणाऱ्या मोठ्या व्यक्तिसोबत जुगलबंदीही करताना दिसतो आहे.

Updated: May 22, 2018, 03:37 PM IST

मुंबई : असं म्हटलं जातं की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. याचा अर्थ ते बाळ भविष्यात मोठे झाल्यावर काय करू शकते याचा अंदाज येणे. या व्हिडिओतही तुम्हाला असेच एक बाळ दिसते आहे. ज्याचे गायनातले कसब पाहून त्याचे भविष्य काय असू शकते याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. झी चोवीस तास या व्हिडिओची पुष्टी करत नही. पण, हा व्हिडिओ सद्या जोरदार व्हायरल होत आहे. 

या व्हिडिओतील मुलगा चक्क सुरात गाताना दिसतो आहे. तो केवळ गातच नाही तर, सुरात गाणाऱ्या मोठ्या व्यक्तिसोबत जुगलबंदीही करताना दिसतो आहे. या मुलाचे वय केवळ चार महिने असून, तो आपल्या बाबांसोबत जुगलबंदी करत असल्याचे सांगितले जात आहे.  Mansaaj Studios नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हडिओ अपलोड करण्यात आला आहे. चॅनलवर असलेल्या माहितीनुसार मुलाचे नाव मनसाज सिंह आहे आणि तो आपल्या वडिलांसोबत गाण्याचा रियाज करतो आहे. यंगेस्ट इंडियन क्लासिकल सिंगर नावाने अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत १५ लाख लोकांनी पाहिला आहे. तुम्हीही या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता.