सपना चौधऱीच्या शोमध्ये फॅन्सचा तुफान डान्स, मंचावरून जोडले हात...

  हरियाणवी डान्सर सपना चौधरी जेव्हा परफॉर्म करते तेव्हा प्रेक्षक झिंगाट होतात. बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली सपना आता हरियाणात नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच हरियाणाच्या झज्जर येथे सपना गाणे सादर करत असताना एका प्रेक्षकाने असे ठुमके लावले की स्वतः सपनाला मंचावरून हात जोडावे लागले. नेहमी देसी अंदाजात दिसणारी सपनाने या शोमध्ये नवे वेस्टर्न डान्सिंग मूव्हज दाखविल्या. 

Prashant Jadhav Updated: Mar 13, 2018, 07:32 PM IST
सपना चौधऱीच्या शोमध्ये फॅन्सचा तुफान डान्स, मंचावरून जोडले हात...

नवी दिल्ली :  हरियाणवी डान्सर सपना चौधरी जेव्हा परफॉर्म करते तेव्हा प्रेक्षक झिंगाट होतात. बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली सपना आता हरियाणात नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच हरियाणाच्या झज्जर येथे सपना गाणे सादर करत असताना एका प्रेक्षकाने असे ठुमके लावले की स्वतः सपनाला मंचावरून हात जोडावे लागले. नेहमी देसी अंदाजात दिसणारी सपनाने या शोमध्ये नवे वेस्टर्न डान्सिंग मूव्हज दाखविल्या. 

हा शो काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. शोच्या सुरूवातील एका प्रेक्षकांने असा डान्स केला की त्यावेळी सपना चौधरी मंचावरून हात जोडताना दिसली. या व्हिडिओ सपना आणि तिच्या फॅन्सचा जबरदस्त डान्स पाहायला मिळेल. 

 

बिग बॉस सिझन ११ मध्ये सपना चौधरी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर ती चित्रपटाची तयारी करत आहे. नुकताच तिचा चित्रपट 'वीरे की वेंडिंग'मध्ये हिंदी डान्स नंबर पाहायला मिळाला आहे. तसेच ती लवकरच बॉलीवूड अभिनेता अभय देओलसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. हिंदी चित्रपटासोबत ती भोजपुरी सिनेमातही दिसणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close