झिरो फिगरला लाजवेल असा हटके डान्स (व्हिडिओ)

हा डान्स आतापर्यंत लाखो नेटीझन्सनी पाहिला आहे.

Updated: Aug 25, 2018, 12:57 PM IST
झिरो फिगरला लाजवेल असा हटके डान्स (व्हिडिओ)

मुंबई: अनेकांना आपल्या फिगरबद्दल भलताच कॉम्प्लेक्स असतो. खास करून काहीशा जाड मंडळींना. अरे मी हा ड्रेस घालू की नको, लोक काय म्हणतील. शीट.. यार! मी ना फारच जाड आहे. जर, माझीही झिरो फिगर असती तर...?, अशा एक ना अनेक विचारांनी या मंडळींच्या मनात सतत संभ्रम निर्माण केलेला असतो.  म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहा. या गाण्यावर एका काहीशा लठ्ठ मुलीने केलेला डान्स पाहा. हा डान्स पाहून झिरो फिगरही तोंडाट बोट घालेल हे नक्की.

पंजाबी गायक गॅरी संधू (Garry Sandhu) हिचा एक म्यूझिक व्हिडिओ 'Yeah Baby' ने युट्यूबवर धमाल केली आहे. याच म्यूझिक व्हिडिओवर गॅरी संधूच्या एका चाहतीने 'Yeah Baby'वर डान्स केला आहे. जो सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. गॅरी संधूने हा व्हिडिओ आपल्य इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा डान्स आतापर्यंत लाखो नेटीझन्सनी पाहिला आहे.

 

She’s too good god bless u ... yeh baby

A post shared by Garry Sandhu (@officialgarrysandhu) on

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close