सिक्रेट सुपरस्टार TRAILER : 'दंगल' गर्लसोबत आमिरची धम्माल!

पहिल्या सिनेमाच्या यशाचा स्वाद घेत असतानाच 'दंगल' गर्ल झायरा वसिम आणि आमिर खानचा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

Updated: Aug 2, 2017, 08:33 PM IST
सिक्रेट सुपरस्टार TRAILER : 'दंगल' गर्लसोबत आमिरची धम्माल! title=

मुंबई : पहिल्या सिनेमाच्या यशाचा स्वाद घेत असतानाच 'दंगल' गर्ल झायरा वसिम आणि आमिर खानचा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमात झायरा मुख्य भूमिकेत दिसतेय. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडताना दिसतोय. 'दंगल'प्रमाणेच या सिनेमातही आमिर झायराच्या गुरुच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आमिर खान शक्ती कुमार नावाच्या एका संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 

गायिका बनण्याचं स्वप्न पाहणारी एक १४ वर्षांची मुलगी... पण परिस्थिती आणि पालक मात्र वेगवेगळ्या सामाजिक कारणांमुळे तिचं स्वप्न पायदळी तुडवतायत... मग, कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय ही मुलगी आपली स्वप्न पूर्ण करते का? आणि कसं? 
इंटरनेटच्या मदतीनं एका 'सिक्रेट सुपरस्टार'पर्यंतचा तिचा प्रवास... या सिनेमातून पाहायला मिळतोय.