त्या कारणाने या मराठी अभिनेत्रीने रजनीकांतचा सिनेमा केला साईन

अभिनेत्री अंजली पाटील ही सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. अंजलीला नेहमीच रजनीकांतच्या सिनेमात काम करण्याची इच्छा होती.

Updated: Oct 12, 2017, 06:13 PM IST
त्या कारणाने या मराठी अभिनेत्रीने रजनीकांतचा सिनेमा केला साईन

चेन्नई : अभिनेत्री अंजली पाटील ही सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. अंजलीला नेहमीच रजनीकांतच्या सिनेमात काम करण्याची इच्छा होती.

पण तिने हा सिनेमा का साईन केला याचं मुख्य कारण नुकतंच सांगितलं. पा. रंजीत दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमात अंजली मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. अंजली म्हणाली की, ‘जेव्हा मी सिनेमा साईन केला तेव्हा मला हे माहित होतं की, या सिनेमात मला माझं अभिनय कौशल्य सिद्ध करायचं नाहीये. मला केवळ रजनीकांतच्या सिनेमाचा भाग व्हायचं होतं. मला या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता’.

रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत अंजली म्हणाली की, ‘हे एखाद्या परी कथेचा भाग होण्यासारखं आहे. ते खूप चांगले आहेत. आपण अशा लोकांना केवळ परीकथेत बघत असतो. ते आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांसाठी चांगले आहेत’.

अंजलीचा हा पहिलाच तमिळ सिनेमा आहे. ‘काला’ या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबतच नाना पाटेकर, पंकक त्रिपाठी, हुमा कुरेशी आणि समुथिरकानीसारखे दिग्गज कलाकार आहेत. धनुष हा या सिनेमाचा निर्माता आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘न्यूटन’मध्येही अंजली पाटीलने भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलंय.