अभिनेता धर्मेंद्र ग्लॅमर आयुष्य सोडून राबताहेत मातीत

ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहून ते सध्या शेतीमध्ये आपलं मनं रमवत आहेत.

Updated: Jun 4, 2018, 08:02 PM IST
अभिनेता धर्मेंद्र ग्लॅमर आयुष्य सोडून राबताहेत मातीत title=

मुंबई : अनेक सेलिब्रेटी ग्लॅमरच्या आयुष्याला  कंटाळून आपल्याला कोणी जास्त ओळखणार नाही अशा ठिकाणी जाणं ते पसंत करतात. बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे एका कामासाठी सध्या चर्चेत आहेत. सध्या ते सिनेसृष्टीपासून दूर आपल्या गावी असून मातीमध्ये राबत आहेत. ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहून ते सध्या शेतीमध्ये आपलं मनं रमवत आहेत. शेतीकाम करतानाचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत, 'वर्क इज वरशिप' म्हणजे 'काम हिच पूजा' असं धर्मेंद्र या फोटोतून म्हणत आहेत. या फोटोसहित त्यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केलाय. यामध्ये ते आपल्या गाईबद्दल सांगत आहेत. गाईला चारा भरवताना ते दिसतायत. आपल्या बागेतील अल्फांसो आंब्यांसोबतही ते एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

लुधियानातला जन्म 

धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबच्या लुधियानातील नसराली गावात झाला.

 

Growing organic wheat!!

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

गेले ५८ वर्षे ते बॉलीवुडमध्ये आहेत.  १९६० साली 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on

'यमला पगला दिवाना : फिर से' या आगामी सिनेमात ते सनी आणि बॉबी देओल सोबत दिसणार आहेत.