या विवाहीत अभिनेत्रीसोबत सनीने केलं होतं गुपचूप लग्न?

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. यात दोघे ऎकमेकांच्या हातात घेऊन बसलेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या प्रेमाची चर्चा जोरदार रंगली आहे.

Updated: Sep 28, 2017, 06:20 PM IST
या विवाहीत अभिनेत्रीसोबत सनीने केलं होतं गुपचूप लग्न? title=

मुंबई : सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. यात दोघे ऎकमेकांच्या हातात घेऊन बसलेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या प्रेमाची चर्चा जोरदार रंगली आहे.

सनी आणि डिंपल या दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यातूनच त्यांच्यात पुढे प्रेम झाले, अशी चर्चा आजही होते. तर याआधीही सनी आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नाच्याही चर्चा झाल्या आहेत. 

लाखो तरूणी सनीवर जीव ओवाळायच्या. ज्यात काही बॉलिवूडच्याही हसीनांचा समावेश होता. मात्र सनीचा एका लग्न झालेल्या तरूणीवर जीव आला होता आणि ती अभिनेत्री होती तेव्हाची सुपर हॉट अभिनेत्री डिंपल कपाडिया. डिंपल कपाडियाचे लग्न अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी झालेले होते. सनी आणि डिंपल यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र कामे केली. त्यांची जोडी खूप लोकप्रियही झाली होती. ज्याप्रमाणे त्यांच्या भूमिका अबोल होत्या, तसेच या दोघांचे नातेही होते. पण प्रेम कधीही लपत नाही ते जगाला कळतंच. 

१९८४ मध्ये सनी आणि डिंपल ही जोडी सर्वात पहिले ‘मंजिल मंजिल’ या सिनेमात एकत्र आली. पब्लिक डिमांड वाढली त्यामुळे अनेक दिग्दर्शकांनी या जोडीला घेऊन सिनेमे करण्याचा सपाटाच लावला होता. नंतर दोघांनी अर्जुन, आग का गोला, नरसिम्हा आणि गुनाह सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले.

त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, सिनेमात रोमान्स करता करता सनी आणि डिंपल हे ख-या आयुष्यातही ऎकमेकांच्या प्रेमात पडले होते. असे सांगितले जाते की, जेव्हा दोघांचे अफेअर सुरू होते. तेव्हा डिंपल राजेश खन्ना यांच्यापासून काही वादामुळे वेगळी राहत होती.

अभिनेता सनी देओलनेही नुकतंच लग्न केलं होतं, पण त्याचं मन डिंपलवर होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची प्रेमकथा ही तब्बल ११ वर्ष सुरू होती. इतकेच काय तर या दोघांनी गुपचुप लग्न केल्याचेही बोलले जात होते. पण या दोघांनी याबाबत कधीही खुलासा केला नाही. पण नुकत्याच समोर आलेल्या दोघांच्या व्हिडिओवरून दोघांमध्ये अजूनही प्रेम असल्याचं स्पष्ट दिसतं आहे.