अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात नाकारली

'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आणि एमएस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतने कोट्यवधी रुपयांची जाहिरात चक्क नाकारली. त्यामुळे सुशांतचे कौतुक होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 12, 2018, 11:58 PM IST
 अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांने कोट्यवधी रुपयांची ही जाहिरात नाकारली

मुंबई : 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला आणि एमएस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतने कोट्यवधी रुपयांची जाहिरात चक्क नाकारली. त्यामुळे सुशांतचे कौतुक होत आहे.

अभिनेता सुशांतला फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ही ऑफर होती. सुशांत आता या क्रीम्सविरोधात लढणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसलाय. या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी सुशांतला १५ कोटी देण्यात येणार होते. 

 ही जाहिरात केली असती तर आपण चुकीच्या गोष्टींचं समर्थन केल्याचा समाजात चुकीचा संदेश गेला असता, या विचाराने त्याने ही ऑफर धुडकावून लावली.

२०१६मध्ये अभय देओल याने फेअरनेस क्रीम्सची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींविरोधात टीका केली होती. त्यानंतर यावर सेलिब्रिटींचं ट्विटर वाद रंगल्याचे पाहिले आहे.

सध्या सुशांत ड्राइव्ह आणि चंदामामा दूर या आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असून तो सारा अली खानसोबत केदारनाथ या चित्रपटातही दिसणार आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close