'ही' अभिनेत्री साकारणार गॅरीची शनाया

कोण साकारणार शनाया 

'ही' अभिनेत्री साकारणार गॅरीची शनाया

मुंबई : मालिकेतील कोणतं पात्र कधी आणि कसं लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. प्रेक्षकांच्या मनाला कोणती मालिका भावेल याचा काही नियम नाही. गेल्या वर्षभरापासून 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतील प्रमुख पात्र राधिका, गुरूनाथ आणि शनाया यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. शनायाचा प्रेक्षकांनी जसा मनापासून राग केला अगदी तसंच आता ते तिच्यावर प्रेम करत असल्याचं स्पष्ट झालं. 

आपल्याला माहित आहे, शनायाचं पात्र लोकप्रिय करण्यासाठी अभिनेत्री रसिका सुनीलने खूप मेहनत घेतली. आणि हे कॅरेक्टर घराघरात पोहोचवलं. आता रसिका या मालिकेचा निरोप घेत आहे. अगदी प्रेक्षकांच्या मनात घर करत असलेलं पात्र सोडून रसिका बाहेर पडत असल्यामुळे या मालिकेत पुढे हे कॅरेक्टर कोण साकारणार? असा प्रश्न साऱ्यांना होता.  नकारात्मक भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना भावतो आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील रसिकांना शनाया भावते आहे. आता आपली आवडती अभिनेत्री या मालिकेत दिसणार नाही. तर हे लोकप्रिय कॅरेक्टर कोण साकारत आहे अशी चर्चा आहे. 

याची खबर आमच्याकडे आहे. रसिका सुनीलने मालिका सोडण्याचं दुःख असलं तरीही तुमची आवडती अभिनेत्री या मालिकेत दिसणार आहे. 'जय मल्हार' मालिकेमुळे बानु बनत घराघरात पोहचलेली इशा केसकर  नवी शनाया बनत पुन्हा छोट्या पडद्यावर दमदार एंट्री करणार असल्याची माहिती मिळते आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत इशा केसकर बाईकवरून एंट्री मारत मालिकेत झळकणार आहे. येत्या 2 सप्टेंबरला डॅशिंग नवीन शनायाचे दर्शन मालिकेत घडणार आहे. या खास भागाचे 29 ऑगस्टलाच चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मिळते आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close