पोलिसाने अभिनेत्रीला म्हटलं 'मॅडम बिकिनीवाला फोटो शेअर करा' आणि मग...

टीव्ही सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्ये आलियाच्या भूमिकेत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री शिखा सिंहने सोशल मीडियात एका पोलिसाला चांगलचं झापलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 18, 2018, 04:14 PM IST
पोलिसाने अभिनेत्रीला म्हटलं 'मॅडम बिकिनीवाला फोटो शेअर करा' आणि मग... title=
Image: @shikhasingh/Instagram

नवी दिल्ली : टीव्ही सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्ये आलियाच्या भूमिकेत असलेली प्रसिद्ध अभिनेत्री शिखा सिंहने सोशल मीडियात एका पोलिसाला चांगलचं झापलं आहे.

या व्यक्तीने शिखा सिंहच्या एका फोटोवर खूपच वाईट कमेंट केली आहे. ही कमेंट इतकी वाईट होती की अभिनेत्री शिखालाही उत्तर देण्यापासून रहावलं नाही आणि तिने त्याला चांगलचं खडसावलं आहे. 

अभिनेत्री शिखाने या व्यक्तीला केवळ झापलचं नाही तर त्याची ओळख आणि फोटोही सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे. 

झालं असं की, अभिनेत्री शिखाने ब्लॅक ड्रेसमध्ये आपला एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं की, "मी तुमच्या व्हिडिओत दिसणारी एक सामान्य मुलगी नाहीये आणि सुपरमॉडलही नाही. मात्र, मी कुठल्याही अटी शिवाय प्रेम करणं शिकली कारण मी मी आहे..."

शिखाच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या. मात्र, एका कमेंटमुळे शिखा संतापली आणि ती कमेंट होती जगदीश गंगे नावाच्या वक्तीची. जगदीश नावाच्या या व्यक्तीने कमेंट केली होती की, 'सुंदर, प्लीज तुझे काही हॉट फोटोजसुद्धा शेअर कर, नव्या वर्षाचं गिफ्ट समजून जसे की बिकिनीवाले...'

यानंतर शिखाने एक फोटो शेअर करत म्हटलं की, 'तुम्हाला कुणी काही म्हणत नाही याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही अपशब्द वापरावे. तुम्ही इतक्या सहजासहजी सुटणार नाही मिस्टर जगदीश गंगे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.' अभिनेत्री शिखाने आपल्या या पोस्टमध्ये मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलिसांनाही टॅग केलं आहे.

जगदिश गंगे नावाच्या व्यक्तीने शिखाच्या पोस्टवर अपशब्द वापरत कमेंट केली आहे. त्याचं अकाऊंट प्रायव्हेट आहे आणि आपल्या माहितीत त्याने स्वत:ला आरटीओत काम करत असल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तीने पोलिसांच्या वर्दीत आपला एक फोटोही पोस्ट केला आहे. 

(नोट: जगदीश गंगे हा व्यक्ती खरचं पोलीस आहे का? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, अभिनेत्री शिखाने त्याचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यात तो पोलिसांच्या कपड्यांत दिसत आहे तसेच आरटीओत काम करत असल्याचं म्हटलं आहे.)