'अगडबम' फेम अभिनेत्री तृप्ती भोईर अडकली लग्नाच्या बेडीत

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तृप्ती भोईर लग्नाच्या बेडीत अडकलीये. अगडबम फेम अभिनेत्रीने दक्षिणेचे संगीतकार टी सतीश चक्रवर्ती यांच्याशी लग्नगाठ बांधलीये.

Updated: Jul 17, 2017, 06:05 PM IST
'अगडबम' फेम अभिनेत्री तृप्ती भोईर अडकली लग्नाच्या बेडीत

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तृप्ती भोईर लग्नाच्या बेडीत अडकलीये. अगडबम फेम अभिनेत्रीने दक्षिणेचे संगीतकार टी सतीश चक्रवर्ती यांच्याशी लग्नगाठ बांधलीये.

मराठी सिनेसृष्टीत या अभिनेत्रीने अभिनयासह अनेक सिनेमांचे दिग्दर्शनही केलेय. सिनेसृष्टीत पाऊल टाकण्याआधी तिने अनेक नाटकांमध्ये काम केले होते. 

'चार दिवस सासूचे', 'वादळवाट' या मालिका तसेच 'इंद्राक्षी', 'सही रे सही' या नाटकांमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीये.

त्यासोबतच 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे', 'अगडबम', 'हॅलो जय हिंद', 'टुरिंग टॉकिज' या सिनेमांचे दिग्दर्शनही केलेय. तसेच यापैकी काही सिनेमांत अभिनयही केलाय.