या '५' अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूड सोडले!

बॉलिवूडमध्ये किती अभिनेत्री येतात आणि जातात.

Updated: Jul 12, 2018, 12:53 PM IST
या '५' अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूड सोडले!

मुंबई : बॉलिवूडमध्ये किती अभिनेत्री येतात आणि जातात. यापैकी काहींचे करिअर हिट असते तर काहींचे फ्लॉप. पण बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्या आपले करिअर हिट असूनही बॉलिवूडला रामराम ठोकतात. अशाच काही अभिनेत्री ज्यांनी लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले. तर पाहुया कोण आहेत या अभिनेत्री...

असिन

गजनी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी अभिनेत्री असिन. असिन मायक्रोमॅक्स कंपनीचे को-फाऊंडर राहुल शर्मा यांच्यासोबत २०१६ मध्ये विवाहबद्ध झाली. त्यानंतर तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. २०१५ मध्ये आलेला 'ऑल इज वेल' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

ट्विटनंतर अभिनेत्री असीन संतापली...

नम्रता शिरोडकर

या यादीत मराठमोठी अभिनेत्री नम्रता शिरोडकरचाही समावेश आहे. २००५ मध्ये साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केल्यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा केले. २००४ मध्ये आलेल्या 'रोक सको तो रोक' या सिनेमात तिने नरेटरची भूमिका साकारली होती.

नम्रताच्या आयुष्यातील दोन महेश ; एकाला सोडून दुसऱ्याशी केले लग्न...

मंदाकिनी

बॉलिवूडच्या सौंदर्यवतींपैकी एक अभिनेत्री मंदाकिनी हिने देखील सिनेसृष्टीला लवकरच बाय बाय म्हटले. तिने १९९० मध्ये मोंकशी लग्न केले. १९८५ मध्ये तिचा शेवटचा सिनेमा आला होता.

'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी आता कशी दिसते?

सोनाली बेंद्रे

९० च्या दशकातील हिट अभिनेत्रींपैकी सोनाली बेंद्रे ही एक होती. मात्र २००२ मध्ये गोल्डी बहलसोबत लग्न केल्यानंतर तिने सिनेमांपासून दूर राहणे पसंत केले. २०१३ मध्ये आलेल्या वन्स अपोन ए टाईम इन मुंबई दोबारा या सिनेमात तिने एक लहानशी भूमिका साकारली होती. मात्र छोट्य़ा पडद्यावरील रियालिटी शो मध्ये सोनाली सक्रीय असते. सध्या न्युयॉर्कमध्ये ती कॅन्सरवर उपचार घेत आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर

ट्विंकल खन्ना 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारशी २००१ मध्ये विवाहबद्ध झाल्यावर ट्विंकल खन्नाने बॉलिवूड बाय केले. २००१ मध्ये आलेली 'लव के लिए कुछ भी करेगा' हा तिचा शेवटचा सिनेमा होता. 

राम रहीम विरोधात ट्विट केल्यामुळे ट्विंकल खन्नाला धमकी