'रेस 3' नंतर बॉबी देओलला मिळाला 'हा' नवा चित्रपट

वर्षभरापूर्वी अभिनेता बॉबी देओलने त्याला काम मिळत नसल्याची खंत एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली होती.

Updated: Mar 13, 2018, 05:23 PM IST
'रेस 3' नंतर बॉबी देओलला मिळाला 'हा' नवा चित्रपट title=

मुंबई : वर्षभरापूर्वी अभिनेता बॉबी देओलने त्याला काम मिळत नसल्याची खंत एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली होती.

बॉबी देओलला यानंतर बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानने 'रेस 3' मध्ये ब्रेक दिला.  

बॉबी देओलकडे अजून एका चित्रपटाची ऑफर  

बॉबी देओल सध्या सलमान खानसोबत 'रेस 3' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र लवकरच तो अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल्ल 4' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

'हाऊसफुल्ल 4' पूर्वी बॉबी देओल धर्मेंद्रसोबतच्या 'यमला पगला दिवाना'च्या सिक्वेलमध्येही झळकणार आहे. 

4 वर्ष होता दूर  

बॉबी देओल 'यमला पगला दिवाना 2' नंतर सुमारे 4 वर्ष रूपेरी पडद्यापासून दूर होता. मात्र आता त्याच्याकडे दोन नवे प्रोजेक्ट आहे. मागील वर्षी बॉबी देओल श्रेयस तळपदे दिग्दर्शित 'पोस्टर बॉईज' या हिंदी चित्रपटामध्ये झळकला होता. मात्र तो चित्रपट बॉक्सऑफिसवर फार कामगिरी करू शकला नाही. हाऊसफुल्ल 4 हा चित्रपट 2019 सालच्या दिवाळीमध्ये रीलिज होणार आहे. 

धमाल कॉमेडी चित्रपट  

एका मीडीया रिपोर्टच्या अहवालानुसआर, हाऊस फुल 4 ची कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. विषय गंभीर वाटत असला तरीही तो एक कॉमेडी चित्रपट आहे.
बॉबी देओलनेही या चित्रपटामध्ये साजिद नाडियावालासोबत काम करायला मिळणार या संधीमुळे उत्साहीत असल्याचे मत व्यक्त केले आहे.