'या' शो द्वारे छोट्या पडद्यावरर आमिर खानची एन्ट्री

कोणत्या कार्यक्रमातून करणार सुरूवात 

'या' शो द्वारे छोट्या पडद्यावरर आमिर खानची एन्ट्री

मुंबई : सलमान खान आणि शाहरूख खाननंतर आता बॉलिवूडचा तिसरा स्टार आमिर खान छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान 16 डिसेंबर पासून 'बिग बॉस'च्या सिझन 12 ला सुरूवात करत आहे. तर शाहरूख खान या वर्षाच्या अखेरीस टीव्ही शो टेड टॉक्स इंडियाचे दुसरे सिझन होस्ट करणार आहे. आता आमिर खान देखील यांना टक्कर देण्यास सज्ज झाला आहे.

आमिर खान आपला सुपरहिट शो 'सत्यमेव जयते' चे तिसरे सिझन घेऊन लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. आमिरने या शो ची तयारी देखील केली आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार शो ला दोन भागांमध्ये रिलीज करणार आहेत. शोकरता यावेळी एकूण 11 एपिसोड शूट केले आहेत. शोचा पहिला भाग 2019 च्या पहिल्या तिमाहीत रिलीज होणार आहे.  

तसेच आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा दिवाळीत रिलीज होत आहे. या सिनेमाचं प्रमोशन संपल्यानंतर आमीर खान सत्यमेव जयतेच्या तयारीला लागणार आहे. या सिझनमधील देशातील प्रत्येक समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close