कतरिना-ऐश्वर्यानं नाकारला अजय देवगनचा हा चित्रपट

अभिनेता अजय देवगनचा बादशाहो हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.

Updated: Aug 22, 2017, 08:09 PM IST
कतरिना-ऐश्वर्यानं नाकारला अजय देवगनचा हा चित्रपट title=

मुंबई : अभिनेता अजय देवगनचा बादशाहो हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजयबरोबर अभिनेत्री एलियाना डिक्रूज प्रमुख भूमिकेत असणार आहे. पण, कतरिना, ऐश्वर्या आणि करिनानं हा चित्रपट नाकारला होता.

या चित्रपटाच्या शूटिंगसाठी करिना आणि कतरिनाच्या तारखा उपलब्ध नव्हत्या असं दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी सांगितलं आहे. करिना आणि कतरिनाकडे मी स्क्रिप्ट घेऊन गेलो होतो. त्यांना चित्रपटाची स्क्रिप्टही आवडली होती पण तारखांमुळे त्यांनी हा चित्रपट नाकारल्याचं लुथरिया म्हणाले. यानंतर मी एलियानाकडे गेलो आणि तिनं चित्रपटाला होकार दिल्याची प्रतिक्रिया लुथरियांनी दिली. ऐश्वर्यानं मात्र हा चित्रपट का नाकारला याचं कारण कळू शकलं नाही.