अक्षय कुमार पाकीटात ठेवतो 'या' व्यक्तीचा फोटो...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचं एक मोठं गुपित आज उघड होणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 14, 2017, 10:55 AM IST
अक्षय कुमार पाकीटात ठेवतो 'या' व्यक्तीचा फोटो...
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचं एक मोठं गुपित आज उघड होणार आहे. खरंतर तर अक्षय आपल्या पत्नीवर म्हणजे ट्विंकल खन्नावर खूप प्रेम करतो. परंतु, त्याच्या पाकीटात मात्र दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो आहे. साहाजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल ही व्यक्ती नेमकी कोण आहे ? र ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून, प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते चार्ली चॅपलिन आहे. हा खुलासा अक्षयकुमारने स्वत:च केला आहे. 

अक्षयने एका मुलाखतीत याविषयी सांगताना म्हटले, माझ्या पाकिटात नेहमीच प्रसिद्ध कॉमेडियन चार्ली चॅपलिन यांचा फोटो असतो. अक्षयकुमार लवरकच छोट्या पडद्यावर ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून परतत आहे. हा या शोचा पाचवा सीजन असून, त्यात अक्षय परीक्षक असणार आहे.

सध्या अक्षय या शोच्या तयारीत व्यस्त आहे. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या एपिसोडची शूटींग करताना अक्षयने चार्ली चॅपलिन यांचे तोंडभरून कौतुक केले. त्याने म्हटले की, "चार्ली चॅपलिन आजदेखील सर्वात महान मनोरंजनकर्ता आहेत. कदाचित यामुळेच आजही माझ्या पाकिटात त्यांचा फोटो असतो. मी त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आजही विश्वास ठेवतो." 

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमध्ये अक्षय व्यतिरिक्त मल्लिका दुआ, जाकिर खान आणि हुसेन दलाल हेदेखील परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त अक्षयच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर शंभर कोटींचा गल्ला केला. लवकरच त्याचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close