अक्षयच्या पॅडमॅनचा ट्रेलर प्रदर्शित....

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 15, 2017, 01:54 PM IST
अक्षयच्या पॅडमॅनचा ट्रेलर प्रदर्शित.... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. या चित्रपटाची निर्माती आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना खुद्द या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक होती. 

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर मुख्य भुमिकेत आहेत. राधिका यात अक्षयच्या पत्नीची भु्मिका साकारत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल.

चित्रपटाची कथा

चित्रपटाची कथा अरुणाचलम मुरुगनंथम नावाच्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा विषय अनोखा आहे. अरुणाचलम या व्यक्तीने स्वस्त दरात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवून एक क्रांतिकारी बदल केला होता. कॉलम लिहिण्यासाठी रिसर्च करताना ट्विंकलला या कथेचा सापडली. आणि ती वाचल्यानंतर तिने यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. पहा या चित्रपटाचा ट्रेलर...

 

काय म्हणाली ट्विंकल...?

ट्विंकलने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अरुणाचलमवर चित्रपट बनवण्यासाठी खूप विनंती केली होती. त्यानंतर हा प्रोजेक्ट साकारण्यात आला. ट्विंकल म्हणाली की, या चित्रपटाचा प्रवास अत्यंत छान होता. मी याचा भाग असल्याने खूप खूश आहे.