निक जोनासच्या मोबाईल वॉलपेपरवर प्रियांकाचा 'हा' फोटो

प्रियांका आणि निकच्या लग्नाची तारीखही आता जवळ येऊ लागली आहे.

Updated: Nov 14, 2018, 04:24 PM IST
निक जोनासच्या मोबाईल वॉलपेपरवर प्रियांकाचा 'हा' फोटो  title=

मुंबई : कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे पाहत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण, आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला असून सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागलेल्या आहेत. या साऱ्यामध्ये 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा पती, निकही प्रकाशझोतात येत आहेत. 

प्रियांका आणि निकच्या लग्नाची तारीखही आता जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे ते दोघंही आपल्या कामासोबतच लग्नाच्या तयारीतही जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मुख्य म्हणजे प्रियांका आणि निक ही जोडी माध्यमांच्या आणि चाहत्यांच्या विशेष आवडीची ठरत आहे. प्रेम करावं तर अगदी मनापासून, याच मूलमंत्रावर ही जोडी त्यांचं नातं पुढे नेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्याचच एक उदाहरण पुन्हा सर्वांसमोर आलं. 

निक लॉस एन्जेलिसमध्ये त्याचा भाऊ जो जोनास याच्यासोबत एका गेम शोसाठी गेला असता छायाचित्रकारांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. त्याचवेळी निकचा एक असा फोटो टीपण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या हातातील फोनचा वॉलपेपर स्पष्टपणे दिसत होता.

मुख्य म्हणजे त्याच्या फोनचा वॉलपेपरच अनेकांचं लक्ष वेधत होता. कारण त्यावर प्रियांका चोप्राचा एक सुरेख फोटो होता. 

मेट गाला या कार्यक्रमात साधारण वर्शभरापूर्वी प्रियांका आणि निकने एकत्र हजेरी लावली होती. त्याच कार्यक्रमावेळचा हा फोटो असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे एका अर्थी निकने प्रियांकासोबतच्या त्या खास क्षणाला आपल्या आयुष्यात एका वेगळ्या मार्गाने तितकच महत्त्वाचं स्थान दिलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

प्रियांका आणि  निकचा विवाहसोहळाही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस येथे हा दिमाखदार सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे.