अमीषा पटेलने शेअर केलेल्या फोटोंवर नेटीझन्सची टीका

सोशल मीडियावर नव नवे फोटो शेअर करतेय अभिनेत्री अमिषा पटेल. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 16, 2018, 10:51 PM IST
अमीषा पटेलने शेअर केलेल्या फोटोंवर नेटीझन्सची टीका  title=

मुंबई : सोशल मीडियावर नव नवे फोटो शेअर करतेय अभिनेत्री अमिषा पटेल. 

नेटवर्किंग साईटवर सतत फोटो शेअर करणारी अमिषा पटेलवर टिका होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ती बोल्ड फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो नेटीझन्सना अजिबातच पसंत पडलेले नाहीत. आणि तिच्या या फोटोंवर लोकांनी रागावून अनेक कमेंट्स केले आहेत. 

Ameesha Patel

अनेक फोटोंसोबत अमीषाने एका ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केला आहे. जो फोटो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे या फोटोत अमीषा हॉट दिसत आहे. 

Ameesha Patel

काहींनी तिच्या या फोटोंच कौतुक केलं आहे तर काही फॅन्स नाराज झाले आहेत. अमीषाचा हा अंदाज पसंत न करणारे अधिक आहेत. 

Ameesha Patel

Ameesha Patel

कहो ना प्यार है या सिनेमांतून अमीषा पटेलने आपलं करिअर सुरू केलं होतं. ऋतिक रोशनसोबतअमिषाने स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर गदर हा सिनेमा अमिषा पटेलचा आला. मात्र त्यानंतर अमीषा कुठेच दिसत नाही. सध्या तिचं करिअर थांबल आहे अशी देखील चर्चा होत आहे. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी अमीषा पटेल असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असल्याची चर्चा होत आहे.