प्रकृती स्थिर झाल्यानंतर बीग बींची पहिली पोस्ट...

जोधपूरमध्ये शूटिंग दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्बेत अचानक बिघडली. 

Updated: Mar 14, 2018, 07:54 AM IST
प्रकृती स्थिर झाल्यानंतर बीग बींची पहिली पोस्ट...

नवी दिल्ली : जोधपूरमध्ये शूटिंग दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यानंतर तातडीने डॉक्टरांची टीम जोधपूरला रवाना झाली. आता अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे. 
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अमिताभ यांनी फेसबुकवर एक मार्मिक पोस्ट केली. अमिताभ यांनी लिहिले की, ''कुछ कष्ट बढ़ा. चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा; इलाज प्रबल, स्वस्थ हुए नवल, चलो इसी बहाने अपनों का पता तो चला.''

 

जया बच्चन यांनी दिली माहिती

जया बच्चन यांनी बीग बींच्या आरोग्याबाबत झी न्यूजला माहिती दिली आहे. 'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान बीग बी यांची प्रकृती बिघडली. आता बीग बीची तब्येत ठीक असल्याचेही जया बच्चन यांनी सांगितले आहे. 

मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बीग बी ही जोडी 

अमिताभ बच्चनसोबत आमीर खान आणि कॅटरिना कैफदेखील दिसणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आणि बीग बी ही जोडी पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. यशराज फिल्म प्रोडक्शन निर्मित 'ठ्ग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.