अमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.

Dakshata Thasale Updated: Mar 14, 2018, 09:03 AM IST
अमिताभ बच्चन यांचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

मुंबई : अमिताभ बच्चन यांची मंगळवारी अचानक तब्बेत बिघडली अशी बातमी आली.

जोधपुर येथे 'ढग ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाचं शुटिंग करता वेळी बिग बी यांना त्रास झाल्यामुळे त्यांची डॉक्टरांची टीम मुंबईहून रवाना झाल्याची माहिती मिळाली. लाखो लोकांच्या गळ्यातील ताईत असलेले बिग बी आजारी पडल्याची बातमी आली की त्यांचा प्रत्येक चाहता कासावीस होतो. 

आपल्या सिनेमांच्या माध्यमातून शहनशाह अमिताभ बच्चन यांचे लाखो चाहते आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षी देखील तरूण कलाकाराला लाजवेल अशी बिग बी यांची एनर्जी आहे. आता अमिताभ बच्चन आमीर खान, कतरिना कैफसोबत आपल्या ढग ऑफ हिंदुस्तान या सिनेमाचं शुटिंग करण्यात व्यस्त आहेत. 

हा फोटो होतोय व्हायरल

अमिताभ आजारी असल्याची बातमी सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखी पसरली. मात्र आता त्यांचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या आजारपणाचा नसून बिग बी यांच्या आगामी सिनेमातील लूक असावा. या फोटो बाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र हा फोटो सध्या चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे. 

अमिताभ यांच्या आजारपणानंतर हा फोटो व्हायरल होत असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. आजारपणाबाबत जया बच्चन आणि स्वतः अमिताभ बच्चन यांनी माहिती दिली. बिग बींनी स्वतः ट्विटरवरून सगळ्यांचे आभार मानले आणि आजारपणात आपली माणसं नेमकी कोण याची माहिती मिळते असं देखील ट्विट केलं आहे. बिग बींचा सिनेमातील या लूकची जबाबदारी झी चोवीस तास घेत नाही. मात्र हा फोटो व्हायरल होत आहे.