'104 नॉट आउट'चं गाणं पहा आणि मिळवा अमिताभ बच्चनना भेटण्याची संधी ...

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ आणि ऋषी कपूर ही जोडी तब्बल 27 वर्षांनी पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. 

Updated: Apr 16, 2018, 03:28 PM IST
'104 नॉट आउट'चं गाणं पहा आणि मिळवा अमिताभ बच्चनना भेटण्याची संधी ...

मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ आणि ऋषी कपूर ही जोडी तब्बल 27 वर्षांनी पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. '102 नॉट आऊट' या चित्रपटामध्ये हे दोन्ही कलाकार एकत्र येणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक चाहत्यांच्या भेटीला आली आहे. 

ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन एकत्र  

या सिनेमांत बिग बी 102 वर्षाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. तर ऋषी कपूर 75 वर्षाच्या मुलाची. या ट्रेलरमध्ये आहे की, जगातील हा पहिला वडिल असेल जो आपल्या 75 वर्षाच्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवत आहेत. ओ माय गॉड सारख्या सिनेमांच दिग्दर्शन करणाऱ्या उमेश शुक्ला यांचा हा सिनेमा आहे. यांनी या सुपरस्टार जोडीला तब्बल 27 वर्षांनी एकत्र आणलं आहे.

 

अमिताभ बच्चनना भेटण्याची संधी 

 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंटवर 'बडुंबा' गाण्याबाबत संकेत दिले आहेत. हे गाणं पहा आणि #MyBadumbaaaStep कॉन्‍टेस्‍ट मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. याद्वारा काही चाह्त्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. 'बंडुबा' हे गाणं अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर  यांच्या आवाजातच रेकॉर्ड करण्यात आले आहे.