'सूर्यवंशम'वर री-ट्विट केल्यावर फसले अमिताभ बच्चन

चाहत्यांनी बिग बींना केलं ट्रोल

'सूर्यवंशम'वर री-ट्विट केल्यावर फसले अमिताभ बच्चन  title=

मुंबई : 21 मे 1999 साली अमिताभ बच्चन आणि सौंदर्याचा 'सूर्यवंशम' हा सिनेमा रिलीज झाला होता. सेट मॅक्सवर हा सिनेमा अनेकदा दाखवला जात आहे. या सिनेमातील डायलॉग लोकांच्या अगदी तोंडपाठ आहेत. सूर्यवंशम या सिनेमाला 21 मे रोजी 19 वर्षे पूर्ण झाली. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका फॅनच्या ट्वीटला रिट्वीट केलं. मात्र 

त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर ट्विटरवर कमेंटचा भडिमार झाला. ट्रोल करून अमिताभ यांना अनेकांनी ट्रोल केलं. अमिताभ बच्चन यांनी या ट्विटबाबत इन्डीड असं म्हटलं. सतत सेट मॅक्वर हा सिनेमा दाखवला जात असल्यामुळे कायम सोशल मीडियावर ही गोष्ट ट्रोल झाली आहे. 

यासाठी सूर्यवंशम हा सिनेमा सेटमॅक्सवर दाखवतात. सूर्यवंशम प्रदर्शित झाला त्याच काळामध्ये मॅक्स हे चॅनल लॉन्च झालं होतं. त्यामुळे चॅनलनं सूर्यवंशम या चित्रपटाचे अधिकार १०० वर्षांसाठी विकत घेतले होते. म्हणून सूर्यवंशम हा चित्रपट मॅक्सवर वारंवार दाखवला जातो. त्यामुळे आता आणखी ८१ वर्ष तरी सूर्यवंशम मॅक्सवर दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. या सिनेमांत अमिताभ बच्चन यांनी बाप- लेकाची भूमिका साकारली आहे. अमिताभचे हे डबल रोल प्रेक्षकांच्या अतिशय पसंतीला पडले.