'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'वर चित्रपट, अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत

 २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक आलं होतं. 

Updated: Jun 6, 2017, 05:45 PM IST
'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'वर चित्रपट, अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत title=

मुंबई : २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक आलं होतं. मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेल्या संजय बारू यांच्या या पुस्तकामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

आता याच पुस्तकावर आधारित नवा चित्रपट येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे या चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. डिसेंबर २०१८मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी रिलीज होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात अनुपम खेर यांच्याशिवाय आणखी कोण भूमिका करणार याची निवड अजून झालेली नाही. हन्सल मेहता यांनी चित्रपटाचा स्क्रीन प्ले लिहीला आहे तर विजय रत्नाकर गुट्टे हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.  

२०१४ लोकसभा निवडणुकीआधी संजय बारू यांचं हे पुस्तक प्रदर्शित झालं होतं. यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चित्रपट रिलीज होणार आहे.  संजय बारू यांच्या या पुस्तकामध्ये मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर जोरदार टीका करण्यात आली होती.