बादशाहच्या 'करेजा' गाण्याची युट्युबावर धूम

हनी सिंग पाठोपाठ आता 'बादशाह'देखील बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री करायला तयार झाला आहे.

Updated: Jan 10, 2018, 11:54 AM IST
बादशाहच्या 'करेजा' गाण्याची युट्युबावर धूम  title=

मुंबई : हनी सिंग पाठोपाठ आता 'बादशाह'देखील बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री करायला तयार झाला आहे.

बादशाहाने त्याच्या चाहत्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2018 या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी त्याचं सिंगल गाणं चाहत्यांसमोर आणलं आहे.  

बादशाहची युट्युबवर धूम  

बादशाह हा रॅप  करणारा कलाकार 'डिजे वाले बाबू' या गाण्यापासून प्रकाशझोतात आला. त्यानंतर बॉलिवूडमध्येही त्याने अनेक सुपरहीट गाणी दिली. मात्र नववर्षाच्या सुरूवातीला त्याने चाहत्यांना एक सिंगल गाणं भेट म्हणून आणलं आहे. 

 

 

'करेजा'  गाणं 

बादशाहच्या 'करेजा' गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. युट्युबवर गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर हीट ठरलं आहे. बादशाहच्या नव्या गाण्याला पहिल्याच दिवशी युट्युबवर 1 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. 

अल्बम ONE  चा भाग  

ONE म्हणजेच ओरिजनल नेव्हर एन्ड्स या अल्बमचा 'करेजा' हेदेखील गाणं भाग आहे. ONE या अल्बमचा 'करेजा' हे दुसरं गाणं आहे. 'करेजा' हे गाणं बादशाहनेच लिहलं आहे.