बाहुबली प्रभासला आवडते ही अभिनेत्री, मुंबईला भेटण्यासाठी येतो

'बाहुबली' या प्रभासाच्या सिनेमानंतर त्याचे संपूर्ण देशात लाखो चाहते तयार झाले आहेत. लाखो मुली त्यांच्या फॅन आहेत. बाहुबली चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 17, 2017, 06:40 PM IST
बाहुबली प्रभासला आवडते ही अभिनेत्री, मुंबईला भेटण्यासाठी येतो title=

मुंबई : 'बाहुबली' या प्रभासाच्या सिनेमानंतर त्याचे संपूर्ण देशात लाखो चाहते तयार झाले आहेत. लाखो मुली त्यांच्या फॅन आहेत. बाहुबली चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

प्रभासचं सिक्रेट क्रश

चाहते त्याची एक झलक मिळविण्यासाठी जिवावर उदार होतात. पण प्रभास हा बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा फार मोठा फॅन आहे. प्रभास हा रविना टंडनचा फार मोठा फॅन आहे. 1995 पासून तो रविणाचा फॅन आहे. रविना टंडन ही त्याची सिक्रेट क्रश असल्याचं त्याने मान्य केलं आहे. प्रभास म्हणतो की, 'मी रविणाचा मोठा चाहता आहे.' रविना टंडनचे अनिल थडानी हे बाहुबली सिनेमाचे वितरक आहेत. त्यामुळे प्रभास आणि अनिल थंडानी हे एकमेकांना ओळखतात.

मुंबईला नेहमी घेतो भेट

जेव्हा प्रभास मुंबईला येतो तेव्हा तो अनिल थडानी आणि रविना टंडन यांना भेटण्यासाठी नक्की येतो. प्रभासची रविना ही सिक्रेट क्रश आहे ही गोष्ट अनिल थडानी आणि रविना यांना अभिनेता राणा गुग्गबाती यांनी सांगितली. प्रभास जेव्हा डिनरसाठी अनिल थडानी आणि रविना टंडनसोबत गेला होता तेव्हा त्याने रविना सोबत एक सेल्फी देखील काढला होता.

प्रभासचं आणखी एक क्रश

बॉलिवूडमध्ये प्रभासवर प्रेम करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. आलिया भट्ट, श्रद्धा कपूर आणि कंगना राणावत यांनी सार्वजनिकरित्या त्याची प्रशंसा केली आहे. रविना टंडन शिवाय आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीवर प्रभास फिदा आहे. ती आहे अभिनेत्री दीपिका पदुकोन.