ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर

जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आयुष्यभर मोलाचं योगदानाबद्दल हा पुरस्करा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो.

Updated: Sep 27, 2017, 11:29 AM IST
ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर title=

मुंबई : जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आयुष्यभर मोलाचं योगदानाबद्दल हा पुरस्करा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो.

पाच लाख रुपये रोख, मानपत्र, आणि सन्मानचिन्हं असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. याआधी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पंडीत जसराज, प्रभा अत्रे, परवीन सुलताना अशा दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. माणिक भिडे यांनी गेली किमान सहा दशकं शास्त्रीय संगीताची सेवा केली आहे.  

कोल्हापूरात गुरु मधुकरराव सडोलीकरांकडून जयपूर अत्रोली घरण्याची तालीम घेतल्यावर माणिकबाई भिडेंनी कलेचं संगोपन केलं. आज महाराष्ट्रात माणिकबाईंचे अनेक शिष्य घराण्याचा वारसा जोपासत आहे. सुप्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे-देशपांडे या माणिकबाईंच्या कन्या होत्या. अशा दिग्गज व्यक्तीमत्वाला मिळणारा हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा योथोचित गौरव असल्याचं मत संगीत वर्तुळात व्यक्त होतं आहे.