नववधू भारती सिंग म्हणतेय सासरच्या हवेत जादू आहे...

कॉमेडीक्वीन भारती सिंग प्रियकर हर्ष लिंबाचियासोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 7, 2017, 10:12 PM IST
नववधू भारती सिंग म्हणतेय सासरच्या हवेत जादू आहे...

 मुंबई : कॉमेडीक्वीन भारती सिंग प्रियकर हर्ष लिंबाचियासोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

3 डिसेंबर रोजी हर्ष आणि भारती गोव्यामध्ये विवाहबद्ध झाली. डेस्टिनेशन वेडिंगनंतर आता हर्ष आणि भारती आपल्या घरी परतली आहे.  

 
 भारतीचा गृहप्रवेश   

 हर्ष आणि भारती सिंगने आपल्या लग्नसोहळ्याचे अनेक विधी सोशल मीडीयाच्या माध्यमातून लाईव्ह  त्यांच्या चाहत्यांसमोर आणले होते. अशावेळी हर्ष आणि भारतीचा लग्नानंतरचा गृहप्रवेशदेखील चाहत्यांसमोर आला आहे. 
 
 भारती सिंगने सासरच्या घरी गृहप्रवेश करतानाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्याखाली स्पेशल मेसेजही लिहला आहे.

 
 'ससुराल के हवा मै जादू है' ... असं म्हणतं  सासरच्या व्यक्तींनी खूपच खास अंदाजामध्ये स्वागत केल्याचे तिने मेसेजमध्ये लिहले आहे. 

  
  आलिशान लग्न  

 
 हर्ष आणि भारतीचा विवाहसोहळा खूपच आलिशान होता. या विवाहावर 50 लाख रूपयांचा खर्च करण्यात आला होता. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती.