‘नागिन’ मौनी रॉय आणि सलमान खान यासाठी एकत्र

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’चं ११ वं सीझन लवकरच सुरू होणार आहे. कलर्स टीव्हीकडून या सीझनचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान आणि ‘नागिन’ फेम मौनी रॉय एकत्र दिसत आहेत. 

Updated: Sep 13, 2017, 10:58 PM IST
‘नागिन’ मौनी रॉय आणि सलमान खान यासाठी एकत्र

मुंबई : वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’चं ११ वं सीझन लवकरच सुरू होणार आहे. कलर्स टीव्हीकडून या सीझनचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान आणि ‘नागिन’ फेम मौनी रॉय एकत्र दिसत आहेत. 

‘शेजारी’ ही यंदाच्या शोची थीम असणार आहे. तसे सलमान खान आणि मौनी रॉय हे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. सलमान खान मौनीसोबत ‘बिग बॉस’च्या सीझन १० मध्येही दिसली होती. 

नेहमीप्रमाणे यंदाही ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणा-या सेलिब्रिटींची नावे गुपित ठेवण्यात आली आहे. कोण कोण यात सहभागी होणार, याचे अनेक अंदाज बांधले जात आहेत. मात्र, याचा खुलासा १ ऑक्टोबरला होणार आहे. कारण याच दिवशी शो ऑन एअर होणार आहे.