श्रीदेवीचा बायोपिक बनणार, ही अभिनेत्री 'चांदनी'च्या भूमिकेत

श्रीदेवीसोबत काम करता न आल्याची खंत चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी व्यक्त केली आहे.

Updated: Mar 19, 2018, 11:04 PM IST
श्रीदेवीचा बायोपिक बनणार, ही अभिनेत्री 'चांदनी'च्या भूमिकेत title=

मुंबई : श्रीदेवीसोबत काम करता न आल्याची खंत चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी व्यक्त केली आहे. असं असलं तरी श्रीदेवीचा बायोपिक बनवणार असल्याची घोषणा हंसल मेहता यांनी केली आहे. या बायोपिकमध्ये श्रीदेवीची भूमिका विद्या बालन साकारू शकते. मागच्या महिन्यामध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. एका चित्रपटासाठी श्रीदेवीची भेट घेणार होतो. पण आता हा चित्रपट श्रीदेवीला समर्पित असेल, असं ट्विट मेहता यांनी केलं आहे.

हंसल मेहता यांचा ओमार्टा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ब्रिटीश-पाकिस्तानी दहशतवादी उमर सईद शेख याच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं शूटिंग भारत आणि ब्रिटनमध्ये करण्यात आलं आहे. हंसल मेहता यांनी शाहिद आणि अलीगड यांच्यासारखे गंभीर विषयाचे चित्रपट केले आहेत. ओमार्टा हा चित्रपट २० एप्रिल रिलीज होणार आहे.