अमिताभ बच्चनपासून दूर झाल्यावर 'या' अभिनेत्यासोबत रेखाचं जोडलं गेलं नाव

कोण आहे हा कलाकार 

अमिताभ बच्चनपासून दूर झाल्यावर 'या' अभिनेत्यासोबत रेखाचं जोडलं गेलं नाव  title=

मुंबई : आज एका अशा अभिनेत्रीचा वाढदिवस आहे जिने फक्त आपल्या अभिनयानेच नाही तर तिच्या सुंदर नखऱ्यांनी सगळ्यांना घायाळ केलं आहे. आम्ही बोलत आहोत एव्हरग्रीन असलेल्या रेखाबद्दल. रेखाचा आज 64 वा वाढदिवस आहे. एकेकाळी लाखोंना घायाळ करणारी अभिनेत्री रेखा एकाएकी सिने पडद्यापासून दूर झाली. 

रेखा अनेक दिवसांपासून लाइटलाइटपासून दूर आहे. मात्र आजही रेखा कोणत्या कार्यक्रमात गेली तर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच असतात. 2014 मध्ये रेखा 'सुपर नानी' या कार्यक्रमात दिसली होती. रेखाचं आयुष्य हे एक बंद पुस्तकं आहे. जेव्हा जेव्हा हे पुस्तक चाळलं जातं तेव्हा तेव्हा अनेक गुपितं बाहेर येतात. 

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच नाव रेखासोबत जोडलं गेलं. या नावाशिवाय रेखा यांच आयुष्य अर्धवट आहे. रेखा आणि अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख  कायमच नकळत एकत्रच होतो. 'दो अनजाने' या सिनेमातून अमिताभ - रेखा पहिल्यांदा एकत्र काम केलं. यानंतर अशी चर्चा आहे की, रेखा - अमिताभ यांच ब्रेकअप झाल्यानंतर तिचं नाव आणखी एका अभिनेत्यासोबत जोडलं गेलं. आणि महत्वाची बाब म्हणजे हा अभिनेता रेखा यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होता. 

रेखा यांनी अमिताभ यांच्याशी ब्रेकअप केल्यावर संजय दत्तसोबत काम सुरू केलं. संजय दत्तसोबत 'जमीन आसमान' या सिनेमाचं शुटिंग केलं. लेखक यासीर उस्मान यांच पुस्तकं Rekha The Untold Story मधील माहितीनुसार 1984 मध्ये आलेल्या या सिनेमात रेखा - संजय दत्त यांच्यात जवळीक वाढली. एवढंच काय तर अशी चर्चा होती की, संजय दत्त आणि रेख यांना गपचुप लग्न केलं. पण त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.