Happy Birthday Shah Rukh Khan : किंग खानच्या बर्थडे बॅशला दणक्यात सुरुवात

'राहुल.... नाम तो सुना होगा...' 

Updated: Nov 2, 2018, 07:50 AM IST
Happy Birthday Shah Rukh Khan : किंग खानच्या बर्थडे बॅशला दणक्यात सुरुवात  title=

मुंबई : 'राहुल.... नाम तो सुना होगा...' असं म्हटलं की एकच  चेहरा समोर येतो. तो चेहरा म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस. 

शाहरुखचा वाढदिवस म्हटल्यावर चाहत्यांना खुणावतं ते ते म्हणजे त्याचं 'मन्नत' हे निवासस्थान. 

यंदाही एक तारखेच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच शाहरुखच्या वाढदिवसाच्या अगदीच सुरुवातीपासून, त्याच्या बंगल्यापाशी चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आणि आपल्या लाडक्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

खुद्द शाहरुखनेही या शुभेच्छांचा स्वीकार करत नंतर त्याच्या कुटुंबियांसोबत हे खास क्षण साजरा केले. शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटोचं कोलाज शेअर केलं. ज्यामध्ये तो पत्नी गौरी खान हिला केक भरवताना दिसतोय, चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसतोय. 

किंग खानने आपल्या चाहत्यांचाही उल्लेख कुटुंब म्हणूनच करत या दिवसाची सुरुवात अगदी आनंदात झाली असून, तो अगदी सुरेखपणे साजरा होत असल्याचं तो म्हणाला. 

यंदा किंग खानचा वाढदिवस हा खूप खास असणार आहे. अर्थात दरवर्षी त्याच्यासाठी काही सरप्राईज वाट पाहत असतात. पण, यंदा मात्र तो स्वत: प्रेक्षकांना सरप्राईज देणार आहे. 

शाहरुखच्या आगामी 'झिरो' या चित्रपटचाचा ट्रेलर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणार असून, हीच चाहत्यांसाठी किंग खानने दिलेली खास भेट ठरणार आहे.