VIDEO : दुर्गापूजेदरम्यान सुष्मिताने सादर केला 'हा' पारंपरिक नृत्यप्रकार

हा व्हिडिओ एकदा पाहाच... 

Updated: Oct 17, 2018, 02:50 PM IST
VIDEO : दुर्गापूजेदरम्यान सुष्मिताने सादर केला 'हा' पारंपरिक नृत्यप्रकार title=

मुंबई: नवरात्रोत्सवाची धून सध्या चांगलीच पाहायला मिळत असून देशाच्या कानाकोपऱ्यात या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत अनेकजण गेले काही दिवस नवरात्रोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत. यामध्ये कलाकार मंडळीही मागे नाहीत. आता याच कलाकार मंडळींपैकी चर्चेत असणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन. 

दुर्गापूजेच्या निमित्ताने सुष्मिताने एका मंडळाला भेट देत शक्तीचं प्रतिक असणाऱ्या देवीच्या दुर्गा रुपाची आराधना केल्याचं पाहायला मिळालं. 

दुर्गापूजेसाठी सुष्मिताला तिच्या दोन्ही मुलींची साथ लाभली. 

रिनी आणि अलिशा या दोन्ही मुलींनी यावेळी आपल्या आईचं म्हणजेच सुष्मिताचं अनुकरण करत देवीची पूजा केली. 

दुर्गापूजेच्याच वेळचा एक व्हिडिओ सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामुळे ती विशेष चर्चेत आली. हा व्हिडिओ होता 'धुनुची नाच' या नृत्यप्रकाराचा. 

अतिशय सुरेख आणि नजाकतीने सुष्मिताने धुनुची नृत्य सादर करत एक प्रकारे कलेच्या माध्यमातून देवीची आराधना केली. तिला यावेळी मुलींनी साथ देत त्यासुद्धा 'धुनुची नाच' करताना दिसल्या. 

धुनुची हा पारंपरिक नृत्यप्रकार असून, नवरात्रोत्सवादरम्यान अनेक दुर्गापूजा मंडळांमध्ये हा सुरेख नृत्यप्रकार पाहायला मिळतो. 

देवीपुढे नृत्य सादर करताना सुष्मिताच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. हाच आनंद तिने व्हि़डिओच्या कॅप्शनमधून व्यक्त केला होता. आपल्या मुलींसोबत शक्तीदायिनी दुर्गेसमोर नृत्य सादर करण्याहून सुरेख दुसरी कोणतीही भावना नाही, हेच ती कॅप्शनच्या माध्यमातून म्हणाली होती.