बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार हरियाणाची डान्सर सपना चौधरी

कुणासोबत करणार स्क्रिन शेअर 

बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार हरियाणाची डान्सर सपना चौधरी

मुंबई :  ठुमके आणि आपल्या अदांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी हिरयाणवी डान्सर सपना चौधरी आता सिनेमांमध्ये अभिनय करणार आहे. सपना चौधरी डेब्यूसाठी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सिनेमा साइन केल्याची माहिती तिने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. सपना चौधरीने शेअर करताना म्हटलं आहे की, dosti ke side effects.... तसेच फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती रंगीबेरंगी सूटमध्ये दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

dosti ke side effects .......! outfit @sitara_by_kim_joshi

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार हरियाणाची डान्सर सपना चौधरी या अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर सलमान खानच्या बिग बॉस शो मध्ये सपना चौधरी पाहायला मिळणार आहे. आताच सपना चौधरीने सिनेमांमध्ये आयटम साँग केलं आहे. आता ती बॉलिवूडमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. या सिनेमात सपना चौधरीसोबत विक्रांत आनंद अभिनय करणार आहे. सपना चौधरी अशी कलाकार आहे जिचे लाखो चाहते आहेत. तिच्या लाईव्ह कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरपूर गर्दी असते. सपना चौधरीची गाणी आणि डान्स व्हिडिओ भरपूर फेमस आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close