कॅन्सर झालेल्या 'या' अभिनेत्रीला सुनील शेट्टीसोबत करायचं होतं लग्न

कोण आहे ही अभिनेत्री 

कॅन्सर झालेल्या 'या' अभिनेत्रीला सुनील शेट्टीसोबत करायचं होतं लग्न

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर आणि ब्रेकअप कायमच चर्चेत असतात. तसेच अनेक कलाकारांमधील प्रेम अगदी थोड्या काळाकरता असतात. तर काहींच नातं अगदी लग्नापर्यंत पोहोचलं आहे. सुनील शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याची लव्हस्टोरी पाहूया... बॉलिवूडमधील एक अभिनेत्री जी आता कॅन्सरशी दोन हात करत आहे ती एकेकाळी सुनील शेट्टीला भरपूर पसंत करत होती. 

1992 मध्ये 'बलवान' या सिनेमातून बॉलिवूड करिअर अगदी दिमाखात सुनील शेट्टीने सुरू केलं. फिल्मी करिअरमध्ये 110 सिनेमे केले. आता सुनील शेट्टी सिनेमांपासून लांब आहे. 1997 मध्ये 'भाई' या सुपरहिट सिनेमांत सोनाली बेंद्रे आणि सुनील शेट्टी ही लीड रोलमध्ये जोडी प्रेक्षकांसमोर आली. या सिनेमा दरम्यान दोन्ही कलाकारांमध्ये जवळीक निर्माण झाली. 

काही वेळातच सोनालीने सुनील शेट्टीला लग्नासाठी प्रपोझ केलं. सुनीलने हे नातं देखील स्विकारलं. सुनील आणि सोनाली ही जोडी टक्कर, सपूत आणि कहर सारख्या सिनेमांत एकत्र दिसले. बॉलिवूडमध्ये दोघांची जोडी अगदी हिट झाली अगदी दोघांच्या नावाची चर्चा देखील रंगली. पण या दोघांच लग्न होऊ शकलं नाही. लग्न न होण्यामागचं कारण खूप मोठं आहे. सुनील शेट्टीने नकार दिल्यामुळे 2002 मध्ये सोनाली बेंद्रेने गोल्डी बहलसोबत लग्न केले. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close