पद्मावती वाद : सुब्रमण्यम स्वामी दीपिकावर भडकले...

  संजय लीला भंसाळीचा चित्रपट 'पद्मावती'बाबत वाद वाढत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.  

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 14, 2017, 09:39 PM IST
पद्मावती वाद :  सुब्रमण्यम स्वामी दीपिकावर भडकले...

नवी दिल्ली :  संजय लीला भंसाळीचा चित्रपट 'पद्मावती'बाबत वाद वाढत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.  

स्वामी यांनी ट्विट करून म्हटले की, अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आम्हांला मागसपणावर लेक्चर देत आहे. हा देश तेव्हाच विकास करू शकतो जेव्हा तीला वाटते की तो मागे जातोय.  

दरम्यान, दीपिका पदुकोण म्हणाली की चित्रपट रिलीज होण्यापासून कोणतेही कारण थांबू शकत नाही. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते संजय लीला भंसाळी यांच्यावर इतिहासाशी छेडछाड करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी आणि संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी केली आहे. 

दीपिकाला पूर्ण विश्वास आहे की, हा चित्रपट आपल्या ठरलेल्या तारखेला म्हणजे १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. ती म्हणाली, हे भयावह आहे. हे बिल्कुल भयावह आहे. यातून आम्हांला काय मिळाले? एक राष्ट्र म्हणून आपण आता कुठे चाललो आहे.  आपण पुढे जायचे आहे, तर आपण मागे चाललो आहे. दीपिका म्हणाली, आम्ही फक्त सेसॉरबोर्डाला जबाबदार आहोत, आणि मला माहित आहे आणि माझे असे मानणे आहे की चित्रपट रिलीज होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. 

दीपिका म्हणाली की, एक महिला म्हणून या चित्रपटाचा भाग होणे आणि तिची कहाणी सांगणे माझ्यासाठी गर्व आहे. ही काहणी सर्वांना सांगणे गरजेचे आहे.  चित्रपट उद्योगातून मिळणारा पाठिंबा पाहता आपल्याला असे लक्षात येईल की आम्ही पद्मावतीबाबत नाही तर चित्रपट उद्योगातील सर्वात मोठी लढाई लढत आहेत.