सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मामध्ये ट्विटरवर खुलेआम रंगतय कोल्ड वॉर

कॉमेडीयन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामधील भांडण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

Updated: Mar 20, 2018, 10:06 PM IST
सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मामध्ये ट्विटरवर खुलेआम रंगतय कोल्ड वॉर title=

मुंबई : कॉमेडीयन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यामधील भांडण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

ट्विटरवर या दोघांमधील वर्ड वॉर पुन्हा सुरू झाले आहे. सुनील ग्रोव्हरने तो 'फॅमिली टाईम विथ कपिल'चा हिस्सा नसल्याचं म्हटलं आहे. त्याऐवजी तो दुसर्‍या शोचा भाग झाला आहे. यानंतर पुन्हा कपिल आणि सुनीलमध्ये वाद सुरू झाले आहेत. 

दबावाखाली येऊन केलं ट्विट  

सुनील ग्रोव्हरने ट्विटर वॉरनंतर एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये कपिलच्या कोणत्याच  गोष्टीचं मला वाईट वाटत नाही. माझे फॅन्सस सतत मला एक प्रश्न विचारत होते. मी कपिल शर्माच्या नव्या शोचा भाग होणार का ? या माझ्या फॅन्सच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. मात्र कपिलला टार्गेट करणं हा माझा उद्देश नव्हता. सतत विचारल्या जाणार्‍या प्रश्नामुळे माझयावर दबाव निर्माण होत होता. अशावेळेस फॅन्सला उत्तर देण्यासाठी मी ट्विट केलं असा सुनीलने खुलासा केला आहे. 

स्वाभाविक होती रिअ‍ॅक्शन 

जेव्हा कपिल म्हणाका 'टाईमिंग' उत्तम होतं तेव्हा रिअ‍ॅक्शन देणं स्वाभाविक आहे. पण हे उत्तर किंवा रिअ‍ॅक्शन माझ्या फॅन्ससाठी होती. लोकं त्याचा काय अर्थ काढतील याकडे फारसे लक्ष देत नसल्याचे सुनीलने स्प्ष्ट केले आहे. 

मी कोणत्या प्रोजेक्टवर काम करतोय याची माहिती दिली नाही. कपिल खरं बोलतोय की खोटं याकडे मी लक्ष देणार नाही. मला फक्त कपिलच्या स्वास्थ्याची चिंता आहे.  

का परत येणार नाही सुनील ग्रोव्हर ? 

कपिलच्या शोमध्ये पुन्हा न येण्याचं कारण सुनील ग्रोव्हरनं स्पष्ट केलं आहे. शोमध्ये परत येण्यासाठी मी मानसिकरित्या तयार नाही. मागील वर्षभरात अनेक कार्यक्रम केले परंतू कोणत्याही रिएलिटी शोमध्ये सहभागी होण्याचं टाळत आहे. 

कपिल शर्माने मला त्याच्या शोमध्ये पुन्हा येण्यासाठी विचारलं होतं ही गोष्ट मी नाकारत नाही. त्यासाठी काही लोकं माझ्या घरी आली होती मात्र मानसिकरित्या मी त्यासाठी अजूनही तयार नाही.  

पुन्हा कपिल सोबत काम करणार का ? 

'आभासी' जगात मी जगत नाही. त्यामुळे भविष्यात मी कपिलसोबत काम करणार की नाही ? या प्रश्नाचं ठाम उत्तर मी आता देऊ शकत नाही. सध्या मी ज्या गोष्टीवर काम करतोय त्याकडे माझं पूर्ण लक्ष केंद्रीत आहे. असे उत्तर सुनील ग्रोव्हरनं दिलं आहे.