३ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार कॉमेडीयन भारती

प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह लवकरच विवाहबद्ध होणार आहे. अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा बॉयफ्रेड हर्ष लिंबाचिया यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 28, 2017, 11:52 PM IST
३ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार कॉमेडीयन भारती  title=
File Photo

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह लवकरच विवाहबद्ध होणार आहे. अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा बॉयफ्रेड हर्ष लिंबाचिया यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. लग्नाच्या तारखेसंदर्भात स्वत: भारती सिंहने खुलासा केला आहे.

भारतीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "त्याने माझं मन चोरलं आहे आणि मी ३ डिसेंबरला आडनाव चोरणार आहे."

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारती आणि हर्ष यांचा विवाह गोव्यात होणार आहे. याच दिवशी भारती आणि हर्षचा मित्र आशका आणि ब्रेंट ग्लोब हे सुद्धा विवाहबद्ध होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतीला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुला हनिमुनला कुठे जायला आवडेल? त्यावर भारतीने म्हटलं की, आम्ही चांगल्या ठिकाणांचा विचार करत असून स्पेन, फ्रांस, यांसारख्या ठिकाणांची नावं लिस्टमध्ये आहेत.