अभिनेता राजपाल यादवची कन्या अडकली विवाहबंधनात

कॉमेडियनर राजपाल यादवची मोठी कन्या विवाहबंधनात अडकलीये. १९ नोव्हेंबरला तिचा विवाहसोहळा पार पडला. कुंडरा या गावात हा विवाहसोहळा झाला. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 22, 2017, 04:52 PM IST
अभिनेता राजपाल यादवची कन्या अडकली विवाहबंधनात title=

मुंबई : कॉमेडियनर राजपाल यादवची मोठी कन्या विवाहबंधनात अडकलीये. १९ नोव्हेंबरला तिचा विवाहसोहळा पार पडला. कुंडरा या गावात हा विवाहसोहळा झाला. 

या विवाहसोहळ्यात बॉलीवूडमधील कोणतीच व्यक्ती उपस्थित नव्हती. लाईमलाईटपासून दूर ठेवण्यासाठीच या सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रित करण्यात आले नव्हते. या सोहळ्यात केवळ कुटुंबातील व्यक्तीच बोलावण्यात आल्या होत्या.

कॅशियर आहे राजपाल यादवचा जावई

राजपाल यादवची कन्या ज्योतीचा विवाह आग्रामध्ये राहणाऱ्या संदीप यादवशी झालाय. संदीप आग्रामध्ये सहकारी बँकेत कॅशियरची नोकरी करतात. या लग्नाचे काही फोटो समोर आलेत. ज्यात ज्योतीने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा आणि संदीपने शेरवानी घातलीये. 

राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे ज्योती

ज्योती ही राजपाल यादवची पहिली पत्नी करुणाची मुलगी आहे. ज्योतीच्या जन्माच्या वेळेस पत्नी करुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर राजपालने २००३मध्ये नऊ वर्षांनी लहान असलेल्या राधाशी दुसरे लग्न केले. आई करुणाच्या निधनानंतर ज्योती १५ वर्षे कुंडरा गावात राहात होती. गेल्या पाच वर्षांपासून ती राजपालजवळ राहतेय. राधा आणि राजपाल यांना हनी नावाची मुलगी आहे. 

असे जमले राधा आणि राजपालचे सूत

राजपाल हीरो सिनेमाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेले होते. यावेळी कॉमन फ्रेंडद्वारे राजपालची राधाशी ओळख झाली आणि त्यांचे सूत जुळले.